लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या कार्यशैलीविरोधात तब्बल 40 हून अधिक मंत्र्यांनी बंड पुकारले आहे. त्यामुळे जॉन्सन यांना मोठा हादरा बसला असून ते गुरूवारी (ता. 7) कोणत्याही क्षणी आपल्याचा पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. बंडखोर नेत्यांपुढे जॉन्सन यांना झुकावे लागल्याने राजीनामा देण्यास ते तयार झाले आहेत. (Britain Political Crisis News)
बोरिस यांच्या कंझरवेटिव्ह पक्षातही ते एकाही पडले आहे. मोजकेच नेते वगळता अनेक बड्या नेत्यांसह मंत्र्यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे आधी ते पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देतील. मागील अनेक दिवसांपासून बोरिस हे आपलं पद वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते.
2019 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळालं होतं. जॉन्सन यांच्या काही निर्णयांविषयी मंत्र्यांमध्ये नाराजी होती. ते मंगळवारी रात्री उफाळून आली. भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजीनाम्यांची जणू त्सुनामीच आली. आतापर्यंत 40 हून अधिक मंत्र्यांनी राजीनामा देत बोरिस यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे.
मंगळवारी रात्री ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक व आरोग्यमंत्री साजित जावेद यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सुनक हे नारायण मूर्तींचे जावई आहेत. त्यानंतर बुधवारी आणखी दोन मंत्र्यांनी राजीनामा देत बोरिस जॉन्सन यांच्या सरकारला धक्का दिला आहे. त्यानंतर राजीनाम्याचे सत्र सुरू झाले.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना जॉन्सन यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला आहे. पिंचर यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची पूर्णकल्पना असूनही त्यांना सरकारमध्ये जबाबदाऱ्या दिल्याची कबुली जॉन्सन यांनी एका मुलाखतीत दिली आहे. ही चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. यावरून बोरिस यांच्यावर ही नामुष्की ओढावल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.