आणखी एक राजकीय भूकंप; नारायण मूर्तींच्या जावयासह चार मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा

ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन सरकार संकटात...
Rishi Sunak Latest Marathi News
Rishi Sunak Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

लंडन : इन्फोसिस या जगप्रसिध्द सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक यांच्यासह चार मंत्र्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. त्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले आहे. (Britain Political Crisis News)

मागील पंधरा दिवसांत अवघ्या जगानं महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथ अनुभवली. शिवसेनेतील 40 आमदारांच्या ऐतिहासिक बंडानं महाविकास आघाडीचं सरकार उलथून टाकलं. त्यानंतर आता जगातील बलाढ्य देश असलेल्या ब्रिटनमधील सरकारलाही मोठा हादरा बसला आहे.

Rishi Sunak Latest Marathi News
ठाकरेंचे विश्वासू वरुण सरदेसाई नागपुरात दिसले; फडणवीसांसोबतचा फोटो व्हायरल

मंगळवारी रात्री ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक व आरोग्यमंत्री साजित जावेद यांनी मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सुनक हे नारायण मूर्तींचे जावई आहेत. त्यानंतर बुधवारी आणखी दोन मंत्र्यांनी राजीनामा देत बोरिस जॉन्सन यांच्या सरकारला धक्का दिला आहे.

बाल व कुटुंब मंत्री विल क्वीन्स आणि वाहतूक मंत्री लॉरा ट्रोट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. सरकारने विश्वास गमावल्यानं राजीनामा देण्याशिवाय पर्यायच नसल्याचे या मंत्र्यांनी म्हटलं आहे. सुनक हे जॉन्सन यांचे निकटवर्ती मानले जातात. पण त्यांच्याच राजीनाम्यानंतर आता जॉन्सन यांच्याही राजीनाम्याची मागणी वाढू लागली आहे.

Rishi Sunak Latest Marathi News
तो 'माजी' सरकारी भाचा, 'Mr. India' झाला आहे का? नितेश राणेही सरदेसाईंच्या शोधात

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना जॉन्सन यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला आहे. पिंचर यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची पूर्णकल्पना असूनही त्यांना सरकारमध्ये जबाबदाऱ्या दिल्याची कबुली जॉन्सन यांनी एका मुलाखतीत दिली आहे. ही चूक झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. पण आता ही मुलाखत प्रसिध्द झाल्यानंतर जॉन्सन यांचं सरकारचं अडचणीत आलं असून चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

ऋषी सुनक यांनी राजीनामा देताना नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, 'सध्या सरकारसमोर अनेक आव्हानं आहेत. पण सरकार पूर्ण क्षमतेने काम करत नाही. त्यासाठी आपण लढायला हवे, म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.' जावेद यांनीही जनतेचा सरकारवरील विश्वास उडाल्याचे सांगत टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com