देशासाठी काहीही! रशियन टॅंक रोखण्यासाठी सैनिकाने पुलासह स्वत:लाही उडवले

रशिया- युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Vitaly Shakun
Vitaly Shakun

नवी दिल्ली : रशिया- युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सुरु असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अफगाणिस्तानसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत आहेत. तर दहा लाखांहून अधिक नागरिक युक्रेन सोडून गेले आहेत. त्याच वेळी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy)यांनी देश सोडून पळून जाण्याच्या वृत्ताचं खंडन एका व्हिडीओद्वारे आपण युक्रेनमध्येच आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत देशासोबत उभे राहू, असे म्हटले आहे.

दरम्यान, युद्धाशी संबंधित काही भावनिक घटनाही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. स्नेक बेटावरील १३ सैनिकांच्या मृत्यूनंतर क्रिमीयातून एक घटना समोर आली आहे. क्रिमियामध्ये, रशियन सैन्याचा (Ukrainian Marine) सामना करताना एका युक्रेनियन सैनिकानं स्वत:लाच पुलासोबत उडवल्याची घटना समोर आली आहे. पुलासोबत स्वत:ला उडवणाऱ्या या युक्रेनियन सैनिकाचे नाव विटाली शकुन (Vitaly Shakun)असे आहे. क्रिमियामध्ये, एका युक्रेनियन सैनिकाने रशियन सैन्याला रोखण्यासाठी एका पुलासह स्वतःला उडवले. त्यामुळे रशियन सैन्याच्या ताफ्याला दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. आता युक्रेनच्या या शूर सैनिकाच्या सर्वोच्च बलिदानाचे कौतुक होत आहे.

Vitaly Shakun
राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले, 'पळून जाणार नाही, मी आणि कुटुंब यु्क्रेनमध्येच'

पुलासोबतच स्वत:ला उडवणाऱ्या युक्रेनियन सैनिकाचे नाव विटाली शकुन असे आहे. क्रिमियन सीमेवरील खेरसन भागातील हेनिचेस्क पुलाच्या रक्षणासाठी विटाली शकुन तैनात होते. युक्रेनच्या सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट शेअर केली आहे. रशियन लष्करी ताफ्याला थांबवण्याचा एकमेव मार्ग हा पूल उडवून देण्याचा निर्णय युक्रेनियन सैनिकांनी घेतला. त्यासाठी पुलाभोवती स्फोटके पेरण्यात आली होती, मात्र तेथून बाहेर पडण्यासाठी फारच कमी वेळ होता. स्फोट झाल्यानंतर आपला मृत्यू निश्चित असल्याचे विटालीला माहिती होते.

दरम्यान, शत्रुचे (रशियाचे) लढाऊ टॅंक रोखण्यासाठी विटाली शकून यांनी तो पूल उडवणार असल्याचा संदेश पाठवला होता. थोड्या वेळाने मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. विटालीच्या या प्रयत्नाने रशियन सैनिकांचा ताफा थांबला. पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी रशियन सैनिकांना खूप संघर्ष करावा लागला. गुरुवारी युद्धाच्या पहिल्या दिवशी मरण पावलेल्या किमान 137 युक्रेनियन सैनिकांपैकी तो असल्याचे मानले जाते.

यूक्रेनच्या सैन्याने शहीद जवानाचे खूप कौतुक केले

सशस्त्र दलाच्या जनरल स्टाफने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, सर्व युक्रेनियन नागरिक आपल्या देशासाठी कठीण काळात एकजुटीने उभे आहेत. क्रिमियन इस्थमसमधील सर्वात कठीण ठिकाणी आमच्या मरीनच्या बटालियनने शत्रूशी जोरदार लढा दिला. त्यांनी शत्रूच्या टाक्यांना रोखण्यासाठी जेनीचेस्की रोड ब्रिज उडवण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com