Narendra Modi Latest News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत नवनवीन यशाची शिखरे सर करत आहे. मागील वर्षी ०२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. आता पुन्हा एकदा सर्व भारतीयांसाठी आनंदाची आणि तितकीच अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.
भारत हा या आर्थिक वर्षात ७५० बिलियन डॉलर्सची निर्यात करून भारत जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. मोदी सरकार(Modi Government)च्या यशस्वी धोरणांमुळे भारत आर्थिक आघाडीवर सातत्याने मोठी कामगिरी करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ७५० अब्ज डॉलरहून अधिक निर्यात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांचं कौतुक केलं आहे.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले ट्विट शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात ७५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात साध्य करण्याच्या यशाबद्दल माहिती दिली. या कामगिरीबद्दल भारतातील नागरिकांचे अभिनंदन. हीच भावना भारताला आगामी काळात स्वावलंबी बनवेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
मागील वर्षी ०२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी या चार देशांत भारत पाचव्या स्थानी आहे. त्याचप्रमाणे आता आणखी एक विक्रम भारताच्या नावावर झाला आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हानांना न जुमानता भारत आर्थिक आघाडीवर सातत्याने मोठी कामगिरी करत आहे. मागील वर्षी ०२ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. आता फक्त चार देश भारताच्या पुढे आहेत. ते म्हणजे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी. त्याचप्रमाणे आता आणखी एक विक्रम भारताच्या नावावर झाला आहे.
मागील वर्षी नवव्या क्रमांकावर...
कोरोना, रशिया-युक्रेन युध्द, जागतिक मंदी यांसह विविध आव्हानांचा सामना करत भारताने मिळविलेलं यश निश्चितच उल्लेखनीय आहे. या आर्थिक वर्षात, भारत ७५० अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात करत जगातील पाचवा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे.
गेल्या वर्षी २०२१-२२ मध्ये भारताने ६०० अब्ज डॉलरची निर्यात केली होती आणि त्यामुळे तो नवव्या क्रमांकावर होता. कोरोनानंतरचे जागतिक संकट, रशिया-युक्रेन संघर्षात जागतिक मंदी, चढे व्याजदर, ऊर्जा संकट, उत्पादन बंद या सर्व परिस्थितीचा विचार करता भारताचे हे यश नेत्रदीपक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.