Vinod Tawde : विनोद तावडेंच्या नेतृत्वाखाली भाजपने रचला 'हा' इतिहास; कामगिरीची दखल नेतृत्व घेणार का?

BJP Member Registration Campaign : भाजपचे सदस्य नोंदणी अभियान 2 सप्टेंबरपासून सुरू झाले असून त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
Vinod Tawde
Vinod TawdeSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नवा इतिहास रचला आहे. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत केवळ 18 दिवसांत तब्बल 4 कोटींहून अधिक सदस्यांची नोंदणीचा आकडा पार करण्यात आला आहे.

विनोद तावडे हे भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचे प्रमुख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोंदणीने या अभियानाला 2 सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. त्यानंतर 18 दिवसांतच पक्षाने मोठा पल्ला गाठल्याची माहिती तावडे यांनी सोशल मीडियातून दिली आहे.

Vinod Tawde
Assembly Election : आधी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधून, आता पोस्टरवरूनही गायब; काँग्रेस नेत्यांमध्ये घमासान

तावडे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपचे सदस्यता अभियान सातत्याने नवा इतिहास रचत आहे. केवळ 18 दिवसांत 4 कोटींचा आकडा पार झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानाला देशवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचेच हे प्रमाण असल्याचे तावडे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित भारताच्या दिशेने पावले टाकत असून त्यामध्ये प्रत्येक नागरिक भाजपचे सदस्य होऊन आपले योगदान देत असल्याचेही तावडे यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Vinod Tawde
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचे YouTube चॅनेल हॅक झाल्याने खळबळ; क्रिप्टोकरन्सीचा व्हिडिओ प्रसारित...

दरम्यान, देशात सध्या जम्मू-काश्मीर आणि हरियाणात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये पुढील महिन्यांत निवडणुकीचे बिगूल वाजू शकते. पुढील वर्षी बिहार, दिल्ली या राज्यांमध्येही निवडणूक आहे. त्यामुळे भाजपने सदस्य नोंदणी अभियानावर जोर दिला आहे.

याच कालावधीत भाजपला नवे राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतात. या स्पर्धेत विनोद तावडे यांच्या नावाचीही चर्चा आहे. सदस्य नोंदणीत पक्षाने गाठलेला विक्रमी टप्पा तावडेंना या पदावर पोहचवण्यासाठी पुरेसा ठरणार का, त्यांच्या या कामगिरीची दखल पक्ष नेतृत्व घेणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com