New Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सोमवारी सकाळी 11 वाजता ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून देशातील अनेक घटकांना खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे त्या कुणाला कोणती गुड न्यूज देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प येण्यास काही मिनिटे उरली आहेत. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पातून खूप अपेक्षा आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या अभिभाषणात अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होतील, असे संकेत दिले होते.
प्रामुख्याने गृहिणी, शेतकरी आणि नोकरदार वर्ग लक्ष ठेऊन आहे. नोकरदार वर्गाला प्राप्तिकरातून सूट मिळणार की पुन्हा एकदा निराशा पदरी पडणार, हे लवकर स्पष्ट होईल. मागील काही महिन्यांत महागाईने गृहिणी त्रस्त झाल्या आहेत. नोकरदारांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे महागाईबाबत सीतारमण दिलासा देऊ शकतात.
शेतकऱ्यांना हमीभावाबाबत अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्यानंतर पहिली सही केलेली फाईल पीएम किसान सन्मान निधीची होती. त्यामुळे अर्थसंकल्पात या निधीमध्ये वाढ केली जाईल, असा अंदाज आहे. हा निधी सहा हजारांवरून 12 हजार रुपयांपर्यंत नेला जाऊ शकतो. तसेच कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाऊ शकते.
देशातील बेरोजगारीची मोठी समस्या असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो. त्यामध्ये तथ्य आहे. लोकसभा निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. त्यामुळे युवकांवर अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. सेवा क्षेत्रात रोजगार निर्मिती व त्यासंबंधित योजना आणली जाऊ शकते. प्रामुख्याने लघु उद्योग, स्टार्ट अपला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निधी दिला जाऊ शकतो.
रेल्वे प्रवाशांना तिकीट दरामध्ये सवलत मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. नवीन वंदे भारत, नव्या एक्सप्रेस, नवे मार्ग, नवे प्रकल्प अपेक्षित आहेत. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई-पुण्यासह मराठवाडा व विदर्भाला सीतारमण काय देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.