Share Market Live : शेअर बाजार कोसळला; अर्थमंत्र्यांची ‘ही’ घोषणा ठरली कारणीभूत...

FM Nirmala Sitharaman Union Budget 2024 Stock Market : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुंतवणूक व त्यासंबंधींच्या करांबाबत काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
Union Budet Share Market
Union Budet Share MarketSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात केलेल्या काही घोषणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये नाराजी निर्माण झाली. परिणामी, सुरूवातीला बाजार तब्बल 1200 अंकांनी कोसळला. बाजारातील स्थिती सुधारत असली तरी गुतंवणूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सीतारमण यांनी कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे भांडवलापासून मिळणाऱ्या नफ्यावरील करात वाढ करण्यात आली आहे. याअंतर्गत लाँग टर्म कॅपिटल गेनचा कर अडीच टक्क्यांनी वाढवून 12 टक्के करण्यात आला आहे. तर शॉर्ट टर्म गेन कर 20 टक्के असेल.

Union Budet Share Market
FM Nirmala Sitharaman Union Budget 2024-25 Speech LIVE in Marathi : अर्थसंकल्पातील घोषणा म्हणजे वाऱ्यावरची वरात; जयंत पाटलांची टीका

भांडवली नफ्यावरील कर वाढवण्यात आल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. दुपारी बारा वाजता सेंसेक्स जवळपास 1200 अंकांनी कोसळून 79.224 पर्यंत खाली आला. दुपारी दीड वाजता सेंसेक्स 80,000 हजार अंकांच्या जवळपास होता. तर निफ्टीही 168 अंकांनी घसरून 24,340 अंकांपर्यंत खाली आला.

Union Budet Share Market
Union Budget 2024 : पाच वर्षानंतर करदात्यांना दिलासा; 17,500 रुपये वाचणार...

सुरूवातीच्या काळात शेअर बाजारात उत्साह दिसत होता. मात्र, कॅपिटल गेन टॅक्सची घोषणा होताच घसरण सुरू झाली. सरकारी कंपन्या, बँकांचे शेअर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. अदानी उद्योगसमुहातील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com