Union Budget 2025 : मोदी सरकारसाठी महिला 'लाडक्या', बजेटमध्ये दिलं मोठं गिफ्ट!

Union Budget 2025 Live updates : ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
Union Budget 2025
Union Budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी 3.0 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिला उद्योजकांसाठीही मोठी घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पात महिला वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे लक्ष दिलं जाणार आहे. यासाठी 5 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.

5 लाख एससी, एसटी महिला उद्योजकांसाठी एक नवीन योजना सुरू केली जाईल. याअंतर्गत, पुढील 5 वर्षांत 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. या महिलांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना कोणत्याही हमीशिवाय सोप्या अटींवर कर्ज दिले जाईल, जेणेकरून त्या स्वतःचे लघु आणि मध्यम उद्योग सुरू करू शकतील.

Union Budget 2025
New Tax Regime 2025 : मध्यमवर्गासाठी मोदींची मोठी भेट; 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न केले करमुक्त

यासोबतच, महिला आणि मुलांचे पोषण बळकट करण्यासाठी सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना देखील सुरू केल्या जातील. या योजनांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या विकासाला गती देणे आहे. सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अंतर्गत, 8 कोटी मुले आणि 1 कोटी गर्भवती महिला, माता आणि 20 लाख किशोरवयीन मुलांना पोषण आहार दिला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आहे की या योजनेतील खर्चाचे निकष वाढवले ​​जातील, ज्यामुळे मुले आणि महिलांना चांगल्या पोषण सुविधा मिळणार आहेत.

Union Budget 2025
Union Budget 2025 : बजेट उघडताच शेतकऱ्यांसाठी खास घोषणा, नवी धनधान्य योजना; बिहारसाठी विशेष बोर्ड

आजच्या या अर्थसंकल्पात ( Union Budget 2025) त्यांनी सर्वसामान्याचं लक्ष लागून असलेल्या टॅक्सबाबत मोठी घोषणा केली. यावेळी इथून पुढे आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यासह आजच्या बजेटमधून त्यांनी शेतकरी, सूक्ष्म व लघू उद्योग यासह विज्ञान आणि तंत्रज्ञानावर भर दिल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com