Union Budget 2025 : बजेट उघडताच शेतकऱ्यांसाठी खास घोषणा, नवी धनधान्य योजना; बिहारसाठी विशेष बोर्ड

Dhnaya Krishi yojna : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सामान्य जनतेसह देशातील शेतकऱ्यांसाठी काही खास घोषणा केल्या.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

Nirmala Sitharaman News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण या आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सामान्य जनतेसह शेतकरी यांच्यासाठी सरकार काय करणार याची माहिती देताना काही घोषणा केल्या. यात शेतकऱ्यांसाठी नव्या धन धान्य योजनेची घोषणा केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प आज सादर करण्यास सुरूवात केली. मात्र त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीलाच काँग्रेससह सपाच्या खासदारांनी जोरदार गदारोळ करत सभात्याग केली. यामुळे सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला होता.

अशा गोंधळातच सीतारामण यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी, आम्ही विकसित भारतासाठी अर्थसंकल्प सादर करत असून सरकारच्या कामगिरी सांगत आहे. मी गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांची विशेष काळजी घेण्याबद्दल बोलत असल्याचे म्हटले.

यानंतर अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. नवीन योजनेत राज्यांसोबत भागीदारी असेल. या योजनेत 100 जिल्हे समाविष्ट केले जातील. ज्याचा लाभ 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार असून गरज पडल्यास, SNAPPY 1 कार्यक्रम ही हाती घेतला जाणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. तर याचा उद्देश ग्रामीण भागातील होणारे स्थलांतर थांबवून नव्या संधी निर्माण करण्याचा असल्याचेही त्या म्हणाल्या.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण यांचा खास लूक! अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली मधुबनी साडी; काय आहे खास कनेक्शन ?

धन धान्य योजना :

ही नवीन योजना तरुण आणि महिलांवर लक्ष केंद्रित करणारी असून त्यांना आपल्या घराजवळ राहून रोजगार करता येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना खात्री देण्यात येणार आहे की, त्यांचे पीक खरेदी केले जाईल, यासाठी केंद्र सरकार थेट धान्य खरेदीचे काम सुरू करेल.

दरम्यान सरकारने तूर, उडद आणि मसूर यासारख्या डाळींच्या खरेदीसाठी रणनीती आखली असून किंमत समर्थन योजना (PSS) आणि किंमत स्थिरीकरण निधीचा (PSF) वापर करण्यात येणार असल्याचेही अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. तर सरकारने 100% उडीद, तुळस आणि मसूर डाळी खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman Speech LIVE : किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा वाढवली, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा

किसान क्रेडिट कार्ड

आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवल्याची घोषणा केली असून आता किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ₹ 3 लाखांवरून ₹ 5 लाखांपर्यंत करण्यात आली आहे. याचा थेट लाभ 7 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना कर्जासाठी होणार आहे. तर किसान क्रेडिट कार्ड (KCC) 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांना अल्पकालीन कर्ज सुविधा देत राहील, असे म्हटले आहे.

मखाना उत्पादन मंडळाची निर्मिती

आगामी बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने मोठी खेळी खेळली आहे. येथील शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमध्ये मखाना उत्पादक मंडळाच्या निर्मितीची घोषणा केली आहे.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : 'इलेक्टोरल बाँड रिकव्हरी' प्रकरणात निर्मला सीतारामन यांना दिलासा!

माखाना बोर्ड

अर्थसंकल्पीय भाषणात बिहारमध्ये माखाना बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी निर्माण होईल. हे मंडळ मखाना उत्पादन तसेच त्याची प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देईल. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होईलच, शिवाय मखानाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नवीन ओळख मिळेल. याचा फायदा मखाना लागवडीमध्ये गुंतलेल्या लोकांना होईल आणि लोकांना त्यासाठी प्रशिक्षण देखील दिले जाईल.

भाज्या आणि फळांसाठी मोठी योजना प्रस्तावित

यावेळी सीतारमण म्हणाल्या, "या अर्थसंकल्पात गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तर प्रस्तावित विकास उपाययोजनांसाठी 10 व्यापक क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे. भाज्या आणि फळांसाठी एक मोठी योजना प्रस्तावित असून उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार एक योजना आणेल.

आसाममध्ये युरिया प्लांट

तसेच केंद्र सरकार आसाममध्ये युरिया प्लांट उभारेल. यामुळे युरिया पुरवठ्यात मदत होईल. या प्लांटची क्षमता 12.7 लाख मेट्रिक टन असेल. हा प्लांट नामरूपमध्ये बांधला जाईल.

Nirmala Sitharaman
Nirmala Sitharaman : 'इलेक्टोरल बाँड रिकव्हरी' प्रकरणात निर्मला सीतारामन यांना दिलासा!

कापूस लागवडीसाठी अभियानाची घोषणा

तर कापूस लागवडीसाठी 5 वर्षांच्या अभियानाची घोषणा यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामण यांनी केली. कापसाचे उत्पादन वाढवण्यासीठी 5 वर्षांचे ध्येय ठेवण्यात आले असून देशाचा कापड व्यवसाय मजबूत करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचे म्हटले आहे. तर लहान उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड देण्यात येणार असून पहिल्या वर्षी 10 लाख कार्ड जारी केले जातील, अशी घोषणा केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत मोठी घोषणा

तसेच अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत मोठी घोषणा करण्यात आली असून यात एआय शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 3 एआय एक्सलन्स सेंटर्स स्थापन केली जाणार असून 5 वर्षांत 75 हजार वैद्यकीय जागा वाढवल्या जाणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com