नवी दिल्ली : अभिनेत्री केतकी चितळे हिच्या वादग्रस्त फेसबुक पोस्टनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे. न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केतकीच्या या पोस्टनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यातच भाजप प्रवक्त्यांना मारतानाचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान मैदानात उतरले आहेत. (Union Minister Dharmendra Pradhan Latest Marathi News)
प्रधान यांनी सोमवारी ट्विट करत शरद पवार यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांत सोशल मीडियावरून पोस्टवरून झालेल्या कारवायांच्या अनुषंगाने त्यांनी हे ट्विट केले आहे. आपण मानहानीकारक किंवा तेढ पसरवणाऱ्या पोस्टच्या बाजूने नसल्याचे सांगत त्यांनी पवार व केजरीवाल यांनी ही प्रकरणे खूप ताणल्याचे प्रधान यांनी म्हटलं आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)
भाषण स्वातंत्र्याचे पुरस्कर्तेच आत अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी खरे धोकादायक आहेत. महाविकास आघाडीपासून आप, टीएमसी तसेच सर्वच विरोधी पक्षांतील नेते टीका आणि फालतू सोशल मीडिया पोस्टविषयी टोकाची भूमिका घेत आहेत. मी मानहानीकारक आणि तेढ पसरवणाऱ्या पोस्टचे समर्थन करत नाही. पण शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांनी खूपच ताणलं आहे.
त्यांची प्रतिष्ठा एवढी तकलादू आहे का? मानसन्मान दुखावल्यानंतर काय घडतं हे याचं एक उत्तम उदाहरण आहे, अशी टीका धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. त्यानंतर भाजप प्रवक्त्यांना झालेली मारहाण त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपचे नेते ताजिंदर पाल सिंग यांना पंजाब पोलिसांनी केलेली अटक आदी घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रधान यांनी ही पोस्ट केली आहे.
दरम्यान, केतकी चितळे हिच्याविरूध्द राज्यभरात ठिकठिकाणी चौदा गुन्हे दाखल झाले आहेत. तिच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी केल्या जात आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.