लखनौ : मुंबईतून (Mumbai) काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशात आपल्या बहिणीच्या विवाहासाठी गेलेल्या तरुणाच्या आईवर पोलिसांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गोळीबारात आईचा मृत्यू झाला आहे. गोहत्या प्रकरणात पोलीस या तरूणाला ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. (Uttar Pradesh Latest Marathi News)
उत्तर प्रदेश पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. संबंधित महिलेवर कुणी गोळी झाडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही, असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यावर गोळीबाराचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनात महिलेला गोळी लागल्याचे दिसत नाही, असा दावाही पोलिसांनी केला आहे.
काय आहे प्रकरण?
अब्दुल रेहमान हा नऊ मे रोजी मुंबईतून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी गेला आहे. तो मुंबईत कामानिमित्त राहतो. त्याच्या बहिणीचा विवाह 22 मे रोजी होणार होता. त्यासाठी कुटुंबाकडून तयारी सुरू होती. घटनेबाबत माहिती देताना अब्दुल रेहमान यांचा भावाने सांगितले की, शनिवारी रात्री अचानक पोलीस आपल्या घरी आले. ते काहीही न सांगता भावाला घेऊन जाऊ लागले होते.
आईने पोलिसांना भावाला घेऊन जाताना अडवले. त्यानंतर पोलिसांनी आईवर गोळी झाडली. त्यानंतर पोलीस तिथून भावाला घेऊन निघून गेले, असंही अब्दुलच्या भावाने माध्यमांना सांगितले. कुटुंबीयांनी अब्दुलच्या आईला तातडीने रुग्णालयात नेले पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील सिध्दार्थनगर सर्कलचे अधिकारी प्रदीप कुमार यादव यांनी सांगितले की, पोलिस तेथील एका गावामध्ये धाड टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी गावांतील लोकांना त्यांना वेढा घातला. त्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. पोलिसांवर गोळीबारही केला. त्यामुळे पोलिसांना आपला बचाव करावा लागला. यामध्ये एका महिलेला गोळी लागली. ही गोळी कुणी झाडली याचा शोध सुरू आहे, असंही यादव यांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी संबंधित गावातील बंदोबस्त वाढवला आहे. धाड टाकताना आरोपीच्या कुटुंबातील नातेवाईकाचा मृत्यू होण्याची ही मे महिन्यातील उत्तर प्रदेशातील दुसरी घटना आहे. नुकतेच चांदौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गँगस्टरच्या मुलीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.