
What Happened on the Gondwana Express? : दिल्लीहून जबलपूरला निघालेले केंद्रीयमंत्री जुएल उरांव शनिवारी रात्री गोंडवाना एक्स्प्रेसमधून अचानक बेपत्ता झाले, ही बाब समोर येताच एकच खळबळ उडाली होती. शेवटचे त्यांना हजरत निजामुद्दीन स्टेशनहून रेल्वेत चढताना बघितलं गेलं होतं. मात्र रविवारी पहाटे दमोह स्टेशनवर त्यांचा बर्थ रिकामा आढळला.
केंद्रीयमंत्री रेल्वेतून बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि सुरक्षा दलाने तत्कळा अलर्ट जार केला आणि शोधमोहीम सुरू केली. जवळपास तीन तासानंतर सिहोरा स्टेशनवर संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या कोच बी३ च्या बर्थ क्रमांक ५७वर मंत्री महोदय जखमी अवस्थेत आढळल्याने सर्वांना एकच धक्का बसला.
प्राप्त माहितीनुसार केंद्रीयमंत्री जुएल उऱांव यांची तब्येत रविवारी पहाटे ३.४५ वाजता दमोह स्टेशवर उतरताना बिघडली होती. त्यांची शुगर लेव्हल अचानक कमी झाली होती, त्याचदरम्यान रेल्वे निघाली आणि ते रेल्वेत चढताना पडले. त्याचवेळी शेजारील प्लॅटफॉर्मवर उभा असलेल्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये ते कसबसे चढले आणि रिकाम्या बर्थमध्ये बसले होते.
विशेष म्हणजे एक्स्प्रेसमधून रहस्यमयरित्या गायब झालेल्या केंद्रीयमंत्र्यांचा शोध त्यांचे कर्मचारी तासंतास घेत होते. सकाळी ६.५५ वाजता त्यांना सिहोरा स्टेशनवर ओळखलं गेलं. प्राथमिक उपचारानंतर जबलपूर स्थित सर्किट हाउसल नेले गेले. या संपूर्ण घटनाक्रमावर केंद्रीयमंत्र्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.