
Vijay Wadettiwar demands atrocity case : सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आल्याने महायुतीमध्ये चांगलाच वादंग सुरू आहे. विरोधकांनीही आता सरकारला धारेवर धरणे सुरू केले आहे. आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी कायद्याने दुसऱ्या खात्यात वळवता येत नाही, असे सांगून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सराकारच्या विरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महायुती सरकारकडे पैसे नव्हते तर लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना कशासाठी झक मारायला आश्वासन दिले? मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी पळवण्यासाठी सरकार स्थापन केले का ? मागासवर्गीय, आदिवासींचे शोषण करण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला अशा शब्दात वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर तोफ डागली.
महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यासाठी दोन खात्यांचा निधी काढून महिला व बाल कल्याण विभागाला दिला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट चांगलेच भडकले आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करून सर्व व्यवहार चव्हाट्यावर आणला आहे. सोबतच शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला जात नसल्याचा पुन्हा आरोप केला जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध ताणले गेले आहेत.
या वादावर वडेट्टीवार म्हणाले, संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागाला लोकसंख्येनुसार निधी दिला जातो. तो निधी वळवणे म्हणजेच त्या संविधानाचा अपमान आहे. समस्त मागासवर्गीयांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार आहे. महाराष्ट्राचे सरकार गादीवर बसण्यास लायक नाही आणि पात्र नाही असा त्याचा अर्थ होतो. मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवण्याचा प्रकार राज्याचा इतिहासात पहिल्यांदा होत आहे. आदिवासी आणि मागासवर्गीयांना या सरकारने दिलेला निधी दुसऱ्या विभागाकडे वळवून प्रचंड अन्याय करण्याची भूमिका सरकारची आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
तसेच या सरकारवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. हे सरकार भांडवलदार व उद्योगपतींसाठी चालवले जात आहे. पीडित, शोषित लोकांनावर अन्याय केला जात आहे असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.