Jyotiraditya Scindia: ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांवर ज्योतिरादित्य शिंदेंचं भाष्य; म्हणाले, न्यायपालिका...

Brij Bhushan Singh: आगामी निवडणुकीबाबतही ज्योतिरादित्य शिंदेंचं भाष्य
Jyotiraditya Scindia and Brij Bhushan Singh
Jyotiraditya Scindia and Brij Bhushan SinghSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : भाजप खासदार आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू आक्रमक झाल्या आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आलेत. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणावर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, "ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून यावर न्यायपालिका निर्णय देईल, तो सर्वांना मान्य करावा लागेल", असं ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

Jyotiraditya Scindia and Brij Bhushan Singh
Palghar Politics: पालघर लोकसभेसह चार विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा; 'बविआ'चीही धाकधूक वाढली !

केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येवून नऊ वर्ष पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवरच मोदी सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी भाजपने उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून केंद्रातील मंत्री विविध शहरात जावून जनतेशी संवाद साधत आहेत. या पार्श्वभूमीवरच ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूरमधील जनतेशी संवाद साधला.

Jyotiraditya Scindia and Brij Bhushan Singh
Kolhapur News : ज्योतिरादित्य शिंदेंचा कोल्हापूरी पाहुणचार; भरलं वांग,झणझणीत ठेच्यावर ताव

दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटप आणि उमेदवार चाचपणी निर्णयासंदर्भात सर्वच पक्ष अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

यावरही केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाष्य केलं. "भाजपने आत्तापर्यंत केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचवणं हे सध्या आमचं काम आहे. आगामी निवडणुकीबाबत ज्या-त्या वेळी निर्णय घेतले जातील", असं त्यांनी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com