Kolhapur Politics News : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
या दौऱ्यावेळी त्यांनी गोपाळ समाजाचे धर्मेंद्र जाधव यांच्या घरी कोल्हापूरी पाहुणचाराचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी भरलं वांग, मटकीची उसळ, झणझणीत कोल्हापूरी ठेचा, दही, बाजरीची भाकरी व गोड शेंगदाणा पोळीचा ताव मारला.
मध्यप्रदेश येथून रोजगाराच्या शोधात आलेला बहुरूपी समाज, स्थानिक गोपाळ व गोसावी समाज आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधीशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ( Jyotiraditya Scindia) यांनी संवाद साधला.
यावेळी शिंदे म्हणाले,कोल्हापूरच्या मातीशी शिंदे कुटुंबाचे रक्ताचे जिव्हाळ्याचे नाते आहे. केंद्रीय मंत्री किंवा मोठा राजकीय नेता म्हणून नव्हे तर या मातीशी असलेल्या रक्ताच्या नात्यामुळे मी येथे आलो आहे. देशातील प्रत्येक भागाचा आणि प्रत्येक समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वांनी जनसेवक म्हणून कार्यरत रहा असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिला आहे. त्यामुळेच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी मी पूर्णत्वास नेणार आहे.
कोल्हापूर (Kolhapur) आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर सोपवलेली आहे. जनसेवक म्हणून या मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार आहे असा विश्वासही मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
शिरोलीतील रहिवाशी अतिक्रमण कायम करण्यासाठी मंत्री शिंदे यांनी सहकार्य करावे अशी विनंती माजी आमदार अमल महाडिक यांनी केली. शिरोली परिसरातील पूरग्रस्तांच्या व नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री शिंदे यांनी दिले.
यावेळी सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, उपसरपंच अविनाश कोळी, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, संतोष कामत, सलिम महात, माजी उपसरपंच कृष्णात करपे, डॉ. सुभाष पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश पाटील, प्रकाश कौंदाडे, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, महमंद महात, आरिफ सर्जेखा आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.