वजन घटवा, किलोमागे एक हजार कोटी मिळवा! गडकरींचं आव्हान खासदारानं स्वीकारलं अन्...

अनिल फिरोजिया यांनी ही ऑफर स्वीकारत चार महिन्यांत 15 किलो वजन कमी केले.
Union Minster Nitin Gadkari Latest Marathi News, MP Anil Firojiya Latest News
Union Minster Nitin Gadkari Latest Marathi News, MP Anil Firojiya Latest NewsSarkarnama

उज्जैन : वजन कमी करण्यासाठी अनेकजण कसोशीनं प्रयत्न करत असतात. अनेकांना त्यासाठी विविध गोष्टींतून प्रेरणा मिळते. पण भाजपच्या एका खासदाराने केंद्रीय नितीन गडकरी यांची ऑफर मनावर घेतलीय. एक किलो वजन कमी करा आणि एक हजार कोटी मिळवा, अशी भन्नाट ऑफर गडकरींनी या खासदाराला दिलीय. आता जवळपास 15 किलो वजन कमी करत या खासदाराने गडकरींकडे 15 हजार कोटी मागितले आहेत. (Nitin Gadkari latest Marathi News)

मध्य प्रदेशातील उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया यांना गडकरींनी ही ऑफर दिली होती. फेब्रुवारी महिन्यात गडकरींनी फिरोजिया यांना वजन कमी करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत पंधरा किलो वजन कमी केले आहे. विविध विकासकामांचे उद्घघाटन करताना गडकरींनी आपल्या भाषणात फिरोजिया यांना आणखी पैसे हवे असतील तर वजन कमी करा. एका किलोमागे एक हजार कोटी देतो, असं आश्वासन दिलं होतं. (MP Anil Firojiya lost almost 15 kilos of weight)

Union Minster Nitin Gadkari Latest Marathi News, MP Anil Firojiya Latest News
महाडिकांचा असाही विजय; विधान परिषद घालवली पण राज्यसभा मिळवली!

फिरोजिया हे 2019 मध्ये पहिल्यांदाच खासदार झाले आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या कार्यक्रमावेळी त्यांचे वजन 127 किलो होते. याविषयी सांगताना ते म्हणाले, मी तंदुरूस्त राहावे यासाठी गडकरींनी ही घोषणा केली होती. मी वजन कमी केले तर एका किलोमागे एक हजार कोटी रुपये विकासकामांसाठी देऊ, असं ते म्हणाले होते. मी हे आव्हान स्वीकारले आणि चार महिन्यात 15 किलो वजन कमी केले आहे.

योगा, सायकलिंग, शारिरीक मेहनक आणि आहाराचे नियोजन या माध्यमातून मी हे करत आहे. माझं वजन सुरूवातीला 127 किलो होते. आता मी 15 किलोने वजन कमी केल्याने माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी 15 हजार कोटी रुपये मागणार आहे, असं फिरोजिया यांनी सांगितलं.

मी यापुढेही वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जेणेकरून गडकरी यांच्याकडून मतदारसंघातील विकासकामांसाठी अधिक निधी आणू शकेन. दरम्यान, गडकरी यांनी या कार्यक्रमात आपण वजन कमी कसे केले, याबाबतही सांगितले होते. त्यापासूनच फिरोजिया यांनीही प्रेरणा घेतलेली असावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com