मुख्यमंत्रिपदाचा दावेदार वाहतूक कोंडीत अडकला अन् काही तासांतच भाजपमधून डच्चू

दिल्लीत पोहचल्यानंतर सोशल मीडियातून हकालपट्टीची बातमी समजल्याचा दावा या नेत्यानं केला आहे.
Harak Singh Rawat
Harak Singh RawatSarkarnama

डेहराडून : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तराखंडमधील (Uttarakhand) राजकीय वातावरण तापू लागलं आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग करणाऱ्या आमदारांकडून नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. असा दबाव टाकणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यालाच भाजपने (BJP) घरचा रस्ता दाखवला आहे. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले हरकसिंह रावत (Harak Singh Rawat) यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रावत यांनी हकालपट्टी झाल्यानंतर अजब दावा केला आहे. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी भेटीसाठी बोलावले होते. पण वाहतूक कोंडीमध्ये मला पोहचण्यास थोडा उशीर झाला. मी जोशी आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना भेटू इच्छित होतो. पण दिल्लीत पोहचल्यानंतर माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सोशल मीडियात पाहिले, असं रावत यांनी म्हटलं आहे. हकालपट्टी करण्यापूर्वी माझ्याशी कसलीही चर्चा केली नाही, असंही त्यांनी सांगितले.

Harak Singh Rawat
स्वेच्छानिवृत्ती घेत भाजपमध्ये प्रवेश करताच IPS अधिकाऱ्यानं केला गौप्यस्फोट

हरक सिंग रावत यांनी 2016 मध्ये दहा आमदारांसह काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याविरोधात त्यांनी बंड केलं होतं. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी दोनता मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण दोन्हीवेळा त्यांना संधी मिळाली नाही. तेव्हापासून ते पक्षावर नाराज असल्याचे बोलले जाते. त्यांच्या मतदारसंघात मेडिकल कॉलेजलाही परवानगी दिली गेली नाही.

आगामी विधानसभा निवणुकीसाठी रावत यांनी आपल्यासह कुटुंबातील तिघांना पक्षाकडे तिकीट मागितले होते. पण पक्षाकडून त्यांना नकार देण्यात आला. त्यामुळे रावत नाराज झाले होते. तसेच त्यांच्या काँग्रेससोबतही चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत होते. त्यानंतर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले होते. पण नेत्यांना भेटण्यापूर्वीच त्यांची हकालपट्टी करण्यात आली.

हरकसिंह रावत म्हणाले, मी तोंड उघडले तर विस्फोट होईल. उत्तराखंडमध्ये भाजपचा पराभव होणार आहे. कॉग्रेस बहुमत मिळणार असून कॉग्रेसची सत्ता येईल. मी ज्या दिवशी भाजपचा गैाप्यस्फोट करेल त्यादिवशी देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होईल. पक्ष सोडून न जाण्याविषयी मी अमित शहा यांना आश्वासन दिले होते. पण आता भाजप सोडल्यानंतर माझ्या मनावरील दडपण खूप कमी झाले आहे. मी अमित शहा यांना भेटणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com