
Union Budget 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उद्या(23 जुलै) रोजी सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून देशातील जनतेच्या अनेक अपेक्षा आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी अर्थसंकल्पाबाबत भाकीत वर्तवलं आहे.
रामदास आठवले(Ramdas Athawale) यांनी म्हटले आहे की, हा अर्थसंकल्प 140 कोटी लोकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्याय देणारे असेल. या अर्थसंकल्पात विकासासाठी भरघोस निधी देण्याबाबत घोषणा होईल. पंतप्रधान मोदींचा विचार आहे की समाजातील प्रत्येक वर्गाला आणि धर्माला न्याय मिळाला पाहीजे. त्यामुळे सर्वांना न्याय देण्याची भूमिका ही अर्थसंकल्पात असेल.
आठवलेंनी एएनआयशी बोलातना सांगितले की, 'शेतकरी, गरीब, युवा किंवा महिला असतील. सर्वांना न्याय देण्याची सरकारची भूमिका असणार आहे. अर्थसंकल्प प्रशंसनीय असेल. अर्थसंकल्प उत्तम असेल. 2024-25चा अर्थसंकल्प देशाला आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय देणारा अर्थसंकल्प असेल.'
आर्थिक सर्वेमध्ये जीडीपीबाबत वर्तवण्यात आलेल्या अंदाजाबाबत आठवले म्हणाले की, ज्याप्रकारे सभागृहात अर्थसंकल्पाबाबत माहिती दिली गेली आहे. त्यात जीडीपी(GDP) वाढणार आहे आणि आर्थिक दृष्टिकोनातून अर्थसंकल्प चांगला असेल. आमचा प्रयत्न असेल की समाजातील सगळ्या वर्गाचे उत्पन्न वाढावे, गरीबी रेषेच्या खाली असलेले त्यातून बाहेर यावेत. मागील दहा वर्षांमध्ये 25 कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले आहेत. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना न्याय देणारा असेल.
याचबरोबर केंद्रीयमंत्री आठवले म्हणाले, 'हा अर्थसंकल्प मध्यवर्गास न्याय देणारा असेल. औद्योगिक विकासाला चालना देणारा असेल, जेणेकरून बेरोजगारांना रोजगार मिळेल. हा अर्थसंकल्प महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकाना न्याय देण्याचं काम हा अर्थसंकल्प करेल. शिक्षण क्षेत्रात प्रगती घडवणारा हा अर्थसंकल्प असेल.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.