Ravneet Singh Bittu : रवनीतसिंग बिट्टू राज्यसभेवर बिनविरोध जाणार; राजस्थानमध्ये पोटनिवडणुकीपूर्वी झाला खेला!

Rajasthan Rajya Sabha By-Election : या पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेसने कोणताही उमेदवार उतरवलेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे.
Ravneet Singh Bittu
Ravneet Singh BittuSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha By-Election in Rajasthan : राजस्थानच्या एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीच्या आधी भाजप नेते सुनील कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज परत घेतला आहे. त्यांनी भाजपकडून डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. कोठारी यांनी उमेदवारी अर्ज परत घेतल्यामुळे आता पक्षाचे दुसरे उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री रवनीतसिंग बिट्टू(Ravneet Singh Bittu) यांचा या जागेवरून बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पोटनिवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी तपासादरम्यान अपक्ष उमेदवार बबीता वाधवानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता. भाजप(BJP) नेते सुनील कोठारी यांनी स्वत:च उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता केवळ बिट्टू हेच निवडणुकीच्या मैदानात शिल्लक आहेत.

Ravneet Singh Bittu
Ravneet Singh Bittu : राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही काँग्रेस सोडणारे रवनीत बिट्टू आहेत तरी कोण?

या पोटनिवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेसने(Congress) कोणताही उमेदवार उतरवलेला नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर आवश्यक असेल तर 3 सप्टेंबर रोजी मतदान होईल. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजेपासून होईल. निवणूक प्रक्रिया 6 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होवू शकेल.

Ravneet Singh Bittu
Ravneet Singh Bittu : पंजाबमध्ये काँग्रेसला धक्का! राहुल गांधींचे निकटवर्तीय रवनीत सिंग बिट्टू भाजपमध्ये दाखल

काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांच्याद्वारे लोकसभा सदस्यपदी निवड झाल्याने राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवरील सदस्याचा कार्यकाळा 21 जून 2026 पर्यंत राहील. राजस्थानात एकूण दहा राज्यसभा जागा आहेत. सध्या भाजपकेड चार आणि काँग्रेसकडे पाच जागा आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com