फडणवीसांची शिष्टाई यशस्वी; केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची अखेर माघार

केंद्रीय मंत्र्याचा मुलगा बंडाच्या पवित्र्यात असल्याने देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढली होती.
Devendra Fadnavis and Siddhesh Naik
Devendra Fadnavis and Siddhesh Naik Sarkarnama

पणजी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Sripad Naik) यांचे पुत्र सिद्धेश नाईक (Siddhesh Naik) यांनी बंडाच्या पवित्रा घेतला होता. यामुळे भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले होता. गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर हा वाद उफाळून आला होता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्याचे भाजप प्रभारी म्हणून केलेल्या शिष्टाईमुळे अखेर सिद्धेश नाईक यांनी माघार घेतली आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी पक्षाविरोधात बंड केले असताना आता आणखी एका बड्या नेत्याच्या मुलाची यात भर पडण्याची चिन्हे होती. श्रीपाद नाईक हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. ते गोव्यातील भाजपचे वजनदार नेते मानले जातात. त्यांचे पुत्र सिद्धेश यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. त्यांना तिकीट नाकारण्यात आल्याने ते पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष लढतील, अशी चर्चा सुरू होती. (Siddhesh Naik News Updates)

सिद्धेश नाईक यांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची भूमिका घेतल्याने त्यांचे वडील श्रीपाद नाईक यांना मनस्ताप सहन करावा लागला. परंतु, त्यांना समजावण्यात श्रीपाद नाईक यशस्वी ठरले. या प्रकरणी दिल्लीतील भाजप नेत्यांनीही शिष्टाई केली. देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत दिल्लीतील नेत्यांशी संपर्क साधून यातून मार्ग काढला.

भाजपने 34 उमेदवारांची पहिली यादी 21 जानेवारीला जाहीर केली होती. उर्वरित 6 उमेदवारांची दुसरी यादी काल (ता.26) जाहीर करण्यात आली आहे. या दुसऱ्या यादीत कुंभारजुवेमधून आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जनिता मडकईकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे श्रीपाद नाईक हे दुखावले होते. पक्षाने हा निर्णय घेताना सिद्धेश नाईक हे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे पुत्र असल्याचा विचार केलेला नाही. यामुळे ते आता बंडखोरी करतील, अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. (Goa Election News)

Devendra Fadnavis and Siddhesh Naik
ममतांना मोठा धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी घेतली माघार

भाजपने उमेदवारी नाकारल्याने अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला रामराम केला आहे. त्यात उत्पल पर्रीकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, इजिदोर फर्नांडिस, एलिना साल्ढाना याचा समावेश आहे. सिद्धेश नाईक हे कुंभारजुवेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. या मतदारसंघातून ते आधीपासूनच तयारी करीत आहेत. आता ते पक्षत्याग करून अपक्ष निवडणूक लढणार की दुसरा पर्याय निवडणार याकडे लक्ष लागले होते. पण पक्षाने वेळीच त्यांची समजूत काढल्याने भाजपसमोरील तिढा सुटला आहे.

Devendra Fadnavis and Siddhesh Naik
रश्मी ठाकरेंनंतर सोमय्या अडचणीत? ध्वजाला सलामी न दिल्याचा फोटो स्वत:च केला ट्विट

भाजपच्या बड्या नेत्यांच्या मुलांनी जाहीरपणे पक्षाकडे मागणी केल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. उत्पल पर्रीकर आणि सिद्धेश नाईक यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, असा सूर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा होता. मात्र, या दोघांनी दावा केलेल्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे काय करायचे, असा प्रश्न भाजप नेतृत्वाला पडला होता. उत्पल आणि सिद्धेश यांना उमेदवारी दिल्यास दोन्ही मतदारसंघात बंडखोरीचा फटका बसण्याचा धोकाही भाजपसमोर होता. यामुळे पक्ष नेतृत्वाने दोघांनाही उमेदवारी दिली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com