Legislative Council Election: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. उत्तरप्रदेश, दिल्ली येथील विधानपरिषदेच्या जागा जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. (Legislative Council Election News update)
उत्तरप्रदेशात नगरपालिका निवडणुकांसह पाच विधान परिषद जागांसाठी भाजपने निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. उत्तरप्रदेशात १२ फेब्रुवारी रोजी विधानपरिषदेच्या तीन आणि शिक्षक मतदारसंघातील दोन आमदारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यासाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत ५ जानेवारी अधिकृत घोषणा होणार आहे.
त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. १२ जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. गोरखपूर फैजाबाद येथील देवेंद्र प्रताप सिंह, कानपूर येथील अरुण पाठक, बरेली-मुरादाबाद येथील सुरेश कुमार त्रिपाठी व राजबहादुर, कानपुर येथील के.सिंह चंदेल यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ समाप्त होत आहे.
तर दुसरीकडे दिल्ली विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी चर्चा सुरु आहे. भाजपने आत्तापर्यंत २२ जणांची यादी तयार केली आहे. लखनौ येथे झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आलेली ही यादी दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आली आहे. त्यानंतर या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. दिल्ली विधानपरिषदेसाठी अनेक नावांची चर्चा आहे. यात ब्रज बहादुर प्रकाश पाल, संतोष सिंह, प्रियंका रावत यांची नावे आघाडीवर आहेत. रजनीकांत माहेश्वरी, मानवेंद्र सिंह यांच्या नावांचीही चर्चत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाल २० जानेवारी समाप्त होत आहे. नव्या अध्यक्षाची निवड आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक जानेवारीत आयोजित करण्यात आली आहे. पुढील वर्षी ९ राज्यात विधानसभा निवडणुक होत आहेत. तर २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक आहे. गेल्या वर्षी ७ जुलै रोजी मोदी सरकारने दुसऱ्यांदा केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १२ मंत्र्यांना पदावरुन हटविण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सरकार, पक्ष, संघटना पातळीवर मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना आणि मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील काही खासदारांना गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. तर काही मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.