Mukesh Khanna : अयोध्येत पराभव, 'शक्तिमान'चा भाजपला मोलाचा सल्ला, म्हणाला, 'कोट्यवधींच्या...'

Mukesh Khanna On Ayodhya Lok Sabha Result: 'शक्तीमान' या लोकप्रिय मालिकेतील अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अयोध्येत भाजपचा पराभव का झाला याचं कारण सांगितलं आहे.
Mukesh Khanna
Mukesh KhannaSarkarnama

Mukesh Khanna On Ayodhya Lok Sabha Result: 'शक्तीमान' मालिकेतील अभिनेते मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये अयोध्येत भाजपचा पराभव का झाला याचं कारण सांगितलं आहे. देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर झाला. या निकालात भाजपला देशात अपेक्षित असं यश मिळालं नसल्याचं पाहायला मिळालं.

'अब की बार चारसो पार'चा नारा दिलेल्या भाजपला अवघ्या 240 जागांवर समाधान मानावं लागलं. भाजपला कमी जागा मिळाल्या यामध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. कारण या राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.

मात्र, देशात सध्या उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या (Ayodhya) जागेची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण ज्या राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजप निवडणुकीत उतरला होता. त्याच अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवाय अयोध्येत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केल्याने अयोध्येतील जनतेने भाजपला नाकारल्याचं स्पष्ट दिसत आहे.

याच मुद्यावरुन आता कोणी भाजपवर अनेकजण टीका करत आहेत. तर कोणी भाजपची बाजू घेत मतदारांना दोष देत आहे. अशातच आता 'शक्तीमान' म्हणून सर्वांना परिचित असणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये राम मंदिराचा फोटो शेअर करत त्यांनी अयोध्येत भाजपचा पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Mukesh Khanna
Bajrang Sonawane : पवारसाहेबांच्या शेजारी खुर्ची मिळाली, बजरंग बाप्पांच्या मोठ्या प्रमोशनची चर्चा रंगली

इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुकेश खन्ना यांनी लिहिलं, 'अयोध्येत झालेल्या पराभवातून आपण हे शिकायला हवं की भव्य मंदिरासोबतच आसपासच्या शहरातील लोकांचं जीवनही भव्य बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोट्यवधींच्या बजेटमध्ये या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काही कोटी बाजूला ठेवले पाहिजेत.

मग ते राम मंदिर असो, चार धाम असो किंवा जयपूरजवळचं खाटू श्यामचं मंदिर असो. श्रद्धेच्या स्थळांना टूरिस्ट स्पॉट बनू देऊ नका. तिथे लोकसुद्धा राहतात, त्यांची काळजी घ्या'. खन्ना यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. यामध्ये काहीजण त्यांच्या पोस्टचं समर्थन करत आहेत. तर काहीजण विरोध करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com