आव्हाडांच्या तक्रारीनंतर कालीचरण बाबाला आज ठाण्याच्या न्यायालयात हजर करणार

कालीचरणबाबाच्या विरोधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला रायपूर येथून अटक करण्यात आली होती.
kalicharan baba
kalicharan baba sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक आणि आक्षेपआर्य वक्तव्य केल्याप्रकरणी बाबा कालीचरण (kalicharan baba) याच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रारी केली होती. वर्धा येथून रात्री उशिरा ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात (thane police) त्याला पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले आहे.

कालीचरणबाबाच्या विरोधात देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला रायपूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर नैापाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. त्याला आज ठाण्याच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या अभिजित उर्फ कालीचरण सराटवर (कालीचरण बाबा) वर्धा शहर पोलिसात भादवीच्या कलम 153, 502(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालीचरण हा छत्तीसगढ राज्यातील रायपूरच्या सेंट्रल जेलमध्ये या प्रकरणी अटकेत होता. यानंतर त्यांला वर्धा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

kalicharan baba
अमोल कोल्हेंवर जितेंद्र आव्हाड संतप्त ; नथुरामाची भूमिका स्वीकारणं हे चुकीचं

गेल्या 26 डिसेंबरला कालीचरण बाबाने महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य रायपूरच्या धर्मपरिषदेत केले होते. यानतंर देशभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. यपूरसह महाराष्ट्राच्या पुणे, वर्धा, अकोला, ठाणे आणि कल्याण येथे महाराजावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात महाराजाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले होते तर त्यानंतर वर्धा पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी रात्री त्याला नैापडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्याविरोधात २९ डिसेंबर रोजी तक्रार दिली होती.

kalicharan baba
उत्तराखंडमध्ये भाजपकडून वादग्रस्त 'चॅम्पियन' आमदाराला डच्चू ; पत्नीला तिकीट

कालीचरण बाबाने महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरुन राजकीय-सामाजिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जात आहे. कालीचरण बाबाला सर्वप्रथम तीस डिसेंबर रोजी पहाटे मध्यप्रदेशातील खजुराहो शहरातून अटक करण्यात आली होती. अकोल्यात काँग्रेसच्या आंदोलनानंतर कालीचरण बाबावर कोतवाली पोलिसांनी भांदवीच्या कलम 294 आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

अधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावरुन गदारोळ माजला होता. रा्ष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्वीट केलं असून अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com