Ravi Kishan News: "शशी थरूर इंग्रजी माणूस, सुट्ट्यांसाठी ते..." रवी किशन यांची बोचरी टीका

Shashi Tharoor On BJP: "5 टप्प्यातील मतदानानंतर भाजप ला 300 जागाही मिळणं अशक्य असल्याचं दिसत आहे. वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे सामान्य नागरिक मोदी सरकारवर नाराज आहे. त्यामुळे उत्तर भारतातही काँग्रेसला यश मिळेल."
Shashi Tharoor, Ravi Kishan
Shashi Tharoor, Ravi KishanSarkarnama

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शिवाय आपल्या विरोधकांच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. अशातच आता भाजप खासदार आणि भोजपरी आणि बॉलिवूडचे अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शशी थरुर हा इंग्रजी माणूस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP) 300 पेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही, असा दावा काँग्रेसचे खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी केला होता. थरूर म्हणाले, "5 टप्प्यातील मतदानानंतर भाजप ला 300 जागाही मिळणं अशक्य असल्याचं दिसत आहे. वाढत्या महागाई आमि बेरोजगारीमुळे सामान्य नागरिक मोदी सरकारवर नाराज आहे. त्यामुळे उत्तर भारतातही काँग्रेसला यश मिळेल."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर शशी थरूर यांची ही टीका भाजप (BJP) खासदार रवी किशन यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे त्यांनी थरूर यांच्या या विधानाचा समाचार घेतला. रवी किशन म्हणाले, आपण सुट्ट्या घालवण्यासाठी मनाली, शिमला अशा ठिकाणी जातो. पण शशी थरूर यांच्यासारखे लोक देशात निवडणुका असताना सुट्ट्या घालविण्यासाठी ते इकडे येतात. त्यांना देशाबद्दल आणि स्वत:च्या गावाबद्दलही काही माहीती नसते. त्यामुळेच मी त्यांना इंग्रजी व्यक्ती म्हणतो. रवी किशन गोरखपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असून ते या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा विधानसभा मतदारसंघ येतो

तसेच रवी किशन 'पीटीआय'शी बोलतना म्हणाले, लोकसभा निवडणुकीचा 4 जूनला निकाल लागल्यानंतर विरोधकांमधील अर्धा डझन पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल. त्यंच्या आघाडीतील 26 पक्षांचा मोठा पराभव होईल तर 6 पक्ष पूर्णपणे नष्ट होतील. विरोधकांना शरीयतच्या नियमांवर देश चालवायचा आहे. पण हे कधीही होऊ शकणार नाही. हा देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसारच चालेल. तसंच भाजपची सत्ता आली तर संविधानाला धक्का लागणार नाही. मात्र काँग्रेसचे सरकार आले तर ते नक्कीच संविधान बदलतील, असंही रवी किशन म्हणाले.

Shashi Tharoor, Ravi Kishan
Rahul Gandhi News: उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं थंड पाणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com