
UPSC Mains Exam Result Update: केंद्रीय लोक सेवा आयोग UPSCने नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. याचबरोबर निकालाची पीडीएफ फाइल आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर उपलब्ध केली गेली आहे. यामध्ये मुख्य परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांचे रोल नंबर दिले आहेत.
यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित राहवे लागेल. निकालाच्या अधिसूचनेनुसार उमेदवारांच्या मुलाखतीची तारीख योग्य वेळेवर जाहीर केले जाईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नवी दिल्लीतील शाहजहान रोडवरील धौलपूर हाऊस येथील कार्यालयात मुलाखती होणार आहेत.
यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल बघण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जावं लागेल.
यानंतर होम पेजवर उपलब्ध निकालाशी संबंधित पीडीएफ लिंकवर क्लिक करावे लागेल.
आता निकाल पीडीएफ फॉर्मेटमध्ये स्क्रीनवर ओपन होईल. जिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता.
यानंतर उमेदवार आपला रोल नंबर आणि नाव तपासू शकता.
ज्या उमेदवारांचे नाव, रोल नंबर यादीत नमूद असेल तेच अंतिम टप्प्यासाठी पात्र मानले जातील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.