Sanjay Malhotra New RBI Governor : मोदी सरकारची मोठी घोषणा! 'आरबीआय'च्या 'गव्हर्नर'पदी संजय मल्होत्रा

Modi Government Announcement New RBI Governor : संजय मल्होत्रा हे आरबीआयचे नवे गव्हर्नर असणार आहे. ​​यांची आरबीआयचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Sanjay Malhotra
Sanjay MalhotraSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : संजय मल्होत्रा हे आरबीआयचे (RBI) नवे गव्हर्नर असणार आहे. ​​यांची आरबीआयचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मल्होत्रा यांची ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.

महसूल सचिव या पदावर मल्होत्रा हे सध्या कार्यरत असून 1990 बॅचच्या राजस्थान केडरचे आयएएस आहेत. मोदी सरकारने (Modi Government) आपल्या तिसर्‍या टर्ममध्ये आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी मल्होत्रा यांची नियुक्ती केली आहे. ते आगामी तीन वर्षांसाठी पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.त्यांनी कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे. मल्होत्रा यांनी यूएसए येथून प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.

Sanjay Malhotra
Kolhapur Politics : नेत्यांनंतर आता शिलेदारांची वेळ; महापालिका, झेडपी इच्छूकही घेणार सोईस्कर भूमिका!

संजय मल्होत्रा हे REC चे कर्मचारी आहेत लिमिटेड या सरकारी कंपनीचे अध्यक्ष आणि एमडीही राहिले आहेत. त्यांनी वीज, वित्त आणि कर, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम अशा अनेक क्षेत्रात काम केले आहे. त्यांनी राजस्थानमध्ये ऊर्जा विभागाचे प्रभारी प्रधान सचिव म्हणूनही काम केले आहे. त्यांनी वित्तीय सेवा विभागात सचिवपदही भूषवले आहे.

आरबीयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ मंगळवारी (ता. 10 डिसेंबर) संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. दास यांच्यानंतर संजय मल्होत्रा हे आरबीआय पुढील गव्हर्नर असणार आहेत. ते तीन वर्ष या पदावर कार्यरत असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com