OBC Reservation : आधी पूजा आता पूर्वा..! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची लक्झरी राहणीमान असलेली लेक वादात

Background of Purva Choudhary's UPSC Selection : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकचाच जाहीर झाला. यामध्ये पूर्वा चौधरी यांनी ५३३ वा क्रमांक मिळवत मोठे य़श प्राप्त केले.
purva chaudhari
purva chaudhariSarkarnama
Published on
Updated on

UPSC ला खोटी माहिती दिल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांची चौकशीही सुरू आहे. त्यांची ओबीसी कोट्यातून झालेल्या निवडीवरूनही वाद निर्माण झाला होता. आता असेच आणखी एक कथित प्रकरण समोर आले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या लेकीच्या निवडीवरून वाद निर्माण झाला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकचाच जाहीर झाला. यामध्ये पूर्वा चौधरी यांनी ५३३ वा क्रमांक मिळवत मोठे य़श प्राप्त केले. मात्र, त्यांनी आपला निकाल सोशल मीडियात शेअर केल्यानंतर एका वादाला सामोरे जावे लागले आहे. पूर्वा यांची निवड ओबीसी कोट्यातून झाली आहे. त्यांचे वडील राजस्थानमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. असे असताना पूर्वा यांनी क्रिमिलेअर कोट्याचा लाभ असा घेतला, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

purva chaudhari
Operation Blue Star : काँग्रेसच्या ‘त्या’ चुकीची जबाबदारी घेण्यास मी तयार! राहुल गांधींचा Video व्हायरल

पूर्वा यांचे वडील ओमप्रकाश सहारन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नियम कसे काम करतात, हे लोकांना माहिती नाही. राजस्थान प्रशासकीय सेवेत वयाच्या ४० शीपूर्वी निवड झाल्यास ओबीसी क्रिमिलेअर कोट्याचा लाभ घेता येत नाही. मी वयाच्या ४४ व्या वर्षी या सेवेत आलो. त्यामुळे माझ्या मुलीने कोट्याचा गैरवापर केल्याचे म्हणणे अयोग्य आहे, असा दावा सहारन यांनी केला आहे.

सहारन यांनी दिल्लीतील काही सोशल मीडिया ग्रुपवरही आक्षेप घेतला. अशी चुकी माहिती पसरविण्याचे काम हे ग्रुप करत आहेत. तिथे एक लॉबी आहे. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही, असेही सहारन यांनी म्हटले आहे. पूर्वी यांची बहीण नव्या सहारन यांनी इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

purva chaudhari
India Vs Pakistan : युध्द झाल्यास ‘पाक’चे इतक्या तासांतच लोटांगण; अशी झाली पोलखोल...

पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर्सनी वडिलांच्या पोस्टकडे बोट दाखवत आरक्षणावर प्रश्न उपस्थित केला. काही यूझर्सनी पूर्वा यांच्या लक्झरी लाईफस्टाईलवरही बोट ठेवले आहे. त्यावरून अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले. पूर्वा या राजस्थानातील हनुमानगढ जिल्ह्यातील असून तेथील सध्याचे आमदार संजीव बेनीवाल हे त्यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियात पूजा खेडकर यांच्यानंतर ओबीसी क्रिमिलेअर कोट्यावरून पुन्हा यानिमित्ताने वाद निर्माण झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com