UPSC Success Story: रेल्वे अपघातात दोन्ही पाय, एक हात गमावलं; तीन बोटांनीच घातली UPSC ला गवसणी! सूरजचं यशाच्या तेजाने...

UPSC Result 2023 : दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे कोणतीही शक्ती मोठी नाही. अपंगत्वावर मात करत, कोणतीही कोचिंग न घेता गरिब घरचा सूरज युपीएससी उत्तीर्ण..
Suraj Tiwari
Suraj Tiwari Sarkarnama

Suraj Tiwari UPSC Success Story: उत्तर प्रदेश या राज्यात मैनपुरी येथे राहणारा दिव्यांग सूरज तिवारी या तरूणाने युपीएसी परिक्षेत यश मिळविले आहे. सूरज तिवारीने एका रेल्वे अपघातात त्याचे दोन्ही पाय आणि एक हात गमवावा लागला होता.तरीही सूरजने हिंमत हरली नाही.सूरजच्या दुर्देम्य इच्छाशक्तीपुढे परिस्थितीलाही नमते घ्यावे लागले. अकस्मातपणे लादलं गेलेल्या अपंगात्वावर सूरजने मात करत दैदीप्यमान यशाला गवसणी घातली आहे.

सूरज तिवारीने यूपीएससी परीक्षेत ९१७ वा क्रमांक मिळवला. सूरजने मिळवलेल्या यशामुळे समाजवादी पक्षाचे (एसपी) अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही आनंद व्यक्त केला आहे. अखिलेश यादव यांनी ट्विट केले की, 'मैनपुरीच्या दिव्यांग सूरज तिवारीने पहिल्याच प्रयत्नात IAS परीक्षा उत्तीर्ण करून संकल्पाची शक्ती इतर सर्व शक्तींपेक्षा मोठी आहे हे सिद्ध केले. सूरजच्या 'सुर्या'सारख्या चमकदार कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा," असे यादव म्हणाले.

Suraj Tiwari
IAS Smita Sabharwal : वयाच्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी ; UPSC परीक्षेतील रँक ऐकून व्हाल थक्क

सुरजने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे की परिस्थिती कितीही कठीण असो... पण प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. सूरजला दोन्ही पाय नाहीत. एक हात नाही. तर दुसऱ्या हाताला फक्त तीन बोटे आहेत, पण सूरजची मेहनत आणि झोकून देवून केलेल्या परिश्रमामुळे आज सूरजने हे स्थान मिळवले आहे.

सूरजच्या वडिल शिंपी आहेत..

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी सूरज 18 ते 20 तास अभ्यास करायचा. कोणत्याही कोचिंग आणि एक्स्ट्रा क्लासेसशिवाय सूरजने हे यश मिळवले आहे. सूरज मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील राजेश तिवारी हे शिंपी असून कुरवली येथे त्यांचे छोटेसे टेलरिंगचे दुकान आहे, त्यातून त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com