आण्विक युध्दाचं सावट? पुतिन यांचं कुटुंब अंडरग्राऊंड; प्राध्यापकाचा खळबळजनक दावा

रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून आता आण्विक युध्दाची भीती व्यक्त केली जात आहे.
Vladimir Putin
Vladimir PutinSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगभरातून आता आण्विक युध्दाची भीती व्यक्त केली जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी आपली अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचा इशारा दिल्यानंतर आण्विक युद्धाच्या भीतीने त्याविषयी चर्चा सुरू झाली. त्यातच त्यांनी आपले कुटुंब अण्वस्त्र हल्ल्यांचाही परिणाम होऊ न शकणाऱ्या न्युक्लिअर बंकरमध्ये पाठवल्याचा धक्कादायक खुलासा एका रशियन प्राध्यापकानं केला आहे. हा बंकरमध्ये एक अंडरग्राउंड शहरच असल्याचा दावा प्राध्यापकानं केला आहे.

रशियन प्राध्यापकाच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. या ठिकाणाबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून हे सायबेरीयातून एक ठिकाण असल्याचे प्राध्यापकाचे म्हणणे आहे. याबाबत डेली मेलने वृत्त दिले आहे. मॉस्को स्टेट इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्सचे माजी प्राध्यापक व्हॅलेरी सोलोव्ही यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Russia Ukraine War)

Vladimir Putin
रशिया आक्रमक; भारताने कीवमधील दुतावास तातडीनं केला बंद

डेली मेलच्या वृत्तानुसार, पुतिन यांना आण्विक युध्दाची भीती वाटत आहे. त्यामुळे कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आधीपासूनच तयार अशलेल्या न्युक्लिअर बंकरमुध्ये कुटुंबीयांना पाठवले आहे. हे बंकर सायबेरियातील अल्ताई पर्वतरांगांमध्ये आहे. या बंकरवर अण्वस्त्रांचा कसलाही परिणाम होणार नाही, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. आठवड्याच्या शेवटी पुतिन यांनी हे पाऊल उचलले आहे. खरंतर हे बंकर नसून अंटरग्राउंड शहरच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात आल्याचा दावाही प्राध्यापकांनी केला आहे.

दरम्यान, प्राध्यापकाच्या दाव्याबाबत वृत्तामध्ये पुष्टी करण्यात आलेली नाही. संबंधित प्राध्यापकाचा याबाबतचा व्हिडीओ युट्यूबवरही टाकण्यात आला आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवसह खारकीव या शहरांवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियन सैन्याने खारकीवमधील स्थानिक सरकारी कार्यालयांवर हल्ला चढवला आहे. त्यामध्ये दहा जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच कीवमधील टेलिव्हिजन टॉवर उडवण्यात आला असून या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील टेलिव्हिजन सेवाही विस्कळित झाली आहे. युक्रेनमधून आतापर्यंत सुमारे सात लाख नागरिक अन्य देशांत गेले आहेत.

Vladimir Putin
बारावीला ९७ टक्के गुण मिळाले तरी युक्रेनला जावं लागलं! नवीनच्या वडिलांचा आक्रोश

खासकीवमधील बॉम्बहल्ल्यात मागील चोवीस तासात २१ जणांचा मृत्यू झाला असून ११२ जण जखमी झाले आहेत, असी माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपियन संघाच्या संसदेत रशियाच्या हल्ल्याचा जोरदार निषेध करत युक्रेनला संघाचे सदस्य करण्याचे आवाहन केले होते. त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com