Ramdas Athawale Video : रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेत डंका, रामदास आठवले म्हणतात, 'आमच्या पक्षाचे नाव...'

Ramdas Athawale donald trump Republican Party : कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असल्याने त्या निवडून आल्या असत्या तर बरे झाले असते, असे रामदास आठवले म्हणाले.
Ramdas Athawale donald trump
Ramdas Athawale donald trumpsarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale News : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाच्या निवडणुकीत कमला हॅरिय यांचा पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले. ट्रम्प यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री रामदास आठवले यांनी ट्रम्प यांच्या विजयाचा संबंध आपल्या रिपब्लिकन पक्षाशी जोडला आहे.

रामदास आठवले म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन आहेत आणि माझ्या पक्षाचे नाव देखील रिपब्लिकन (पार्टी ऑफ इंडिया) आहे. त्याच्या निवडीने मी खूप खूश आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील.

'अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांची, हिंदू असो वा मुस्लिम, त्यांची मते ट्रम्प यांच्याकडे गेली आहेत. आम्ही त्यांच्या निवडीमुळे आनंदी आहोत पण कमला हॅरिसच्या पराभवामुळे दु:खीही आहोत. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार असल्याने त्या निवडून आल्या असत्या तर बरे झाले असते.', असे देखील रामदास आठवले म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ होणार आहेत, असा दावा देखील रामदास आठवले यांनी केला.

Ramdas Athawale donald trump
Tuljapur Assembly Constituency : टेक्निकल टेक्स्टाईल पार्कमुळे आर्थिक कायापालट होणार! दहा हजार तरुणांच्या हातालाही काम

डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरीस यांचा एकतर्फी पराभव केला. ते अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष असणार आहेत. शिवाय ट्रम्प यांना निवडणुकीत 277 मतं मिळाली तर कमला हॅरिस यांना 226 मते मिळाली आहेत.

पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुमच्या ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल मनापासून अभिनंदन. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, असे म्हटले आहे.

Ramdas Athawale donald trump
Manoj Jarange : तुम्ही त्यावेळी झोपेत होते का ? जरांगेंचा राज ठाकरेंना खरमरीत टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com