Beed News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच बुधवारी मनसे नेते राज ठाकरे यांनी लातूर येथील सभेत मनोज जरांगे यांच्यावर टीका करीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर ठाकरे यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी गेवराईतील सभेत जोरदार प्रत्युत्तर दिले.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने दिवसेंदिवस वातावरण तापत चालले आहे. त्यामुळे आता सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. लातूर येथील प्रचार सभेत राज ठाकरे यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधला होता.
सर्वच राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा की ते आरक्षण कसे देणार आहेत. राज्यातील सर्वच जिल्ह्यात मोर्चे निघाले त्या मोर्चाचे काय झाले ? आतापर्यंत तरी आरक्षण मिळाले नाही, जरांगे पाटील उपोषणाला बसतात म्हणतात आता निवडणूक लढवू, नंतर म्हणतात निवडणूक लढविणार नाही, आता पाडणार. तुम्हाला निवडणूक लढवयाची तर लढवा पडायचे तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही आरक्षण कसे देणार आहात हीच वस्तुस्थिती मी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी मांडली होती, असे राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या वक्तव्यानंतर जरांगे पाटील यांनी पलटवार केला. आरक्षण कसे देणार? माझ्या समाजाला माहीत आहे, ते तुम्हाला नाही कळणार. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहीत तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे तुम्हाला माहित आहे, आणि अस्तित्व कसे टिकवायचे हे माहीत आहे, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.
यावेळी त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा वर्ग आमचा आहे. मी प्रामाणिक सांगतो त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळत, ते मी दिले आहे, ते तुम्हाला माहीत नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते, असा खरमरीत टोला जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना लगावला.
आता पुढेही आरक्षण मिळणार आणि बिना सत्तेचे आरक्षण मिळते, असे जरांगे यांनी ठणकावले. माझा समाज मला संकटात आणायचा नव्हता. लढायचे की नाही लढायचे हे मी आणि माझा समाज बघेल. माझ्या समाजाला काय आवश्यक आहे ते मी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी आता त्यांच्याकडे ठेका दिला आहे का?
माझा समाज मला मोठा करायचा कसा ते मला बघायचे. मी समाजाचे अस्तित्व खल्लास होऊ देणार नाही. मला समाजात दुफळी होऊ द्यायची नव्हती, आणि ती होऊ दिली नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आमची काळजी करू नये असे जरांगे म्हणाले. त्यासोबतच आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेका दिला आहे का? अशी घणाघाती टीका सुद्धा जरांगे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.