US President Donald Trump : राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच ट्रम्प यांना मोठा धक्का; भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने साथ सोडली...

Vivek Ramaswamy DOGE Department Donald Trump oath taking Ceremony : अमेरिकेतील भारतीय वंशाचे अब्जाधीश विवेक रामास्वामी यांच्याकडे ट्रम्प यांनी दक्षता विभागाची जबाबदारी सोपवली होती.
Donald Trump, Vivek Ramaswamy
Donald Trump, Vivek RamaswamySarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाचे निर्णयही घेतले. पण त्यांना एक मोठा धक्काही बसला आहे. शपथविधीनंतर काही तासांतच त्यांच्या टीममधील भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने ट्रम्प यांची साथ सोडली आहे. त्यामुळे याचीही जोरदार चर्चा अमेरिकेत आहे.

अमेरिकेतील भारतीय वंशाचे अब्जाधीश विवेक रामास्वामी यांच्याकडे ट्रम्प यांनी दक्षता विभागाची जबाबदारी सोपवली होती. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी या विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी ट्रम्प यांनी रामास्वामी यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यांच्यासोबत एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांच्यावरही या विभागाची जबाबदारी टाकण्यात आली होती.

Donald Trump, Vivek Ramaswamy
Amit Shah on Naxal encounter : शहांच्या प्लॅननुसार यंत्रणा सक्रीय; 8 जवानांच्या मृत्यूचा बदला, 14 नक्षलवाद्यांचा खात्मा

विवेक रामास्वामी हे टीममधून बाहेर पडल्याने आता मस्क हे एकटेच हा विभाग सांभाळतील. रामास्वामी यांनी एक्सवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, DOGE च्या स्थापनेत सहकार्य करणे माझा सन्मान होता. इलॉन मस्क आणि त्यांची टीम सरकार सुस्थितीत ठेवण्यासाठी यशस्वी ठरेल. ओहायोमध्ये भविष्यातील नियोजनाची माहिती लवकरच देईन, असे रामास्वामी यांनी म्हटले आहे.

निवडणुकीची तयारी

विवेक रामास्वामी हे राजकारणात येण्यापूर्वी एक बायोटेक कंपनी चालवत होते. जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीही त्यांनी तयारी केली होती. ट्रम्प यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांनी माघार घेतली. आता ओहायो राज्याच्या गव्हर्नर पदाच्या निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. रामास्वामी यांनी निवडणुकीत विजय मिळवला तर ते पहिले भारतीय वंशाचे नेते ठरणार आहेत. 

Donald Trump, Vivek Ramaswamy
Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत केजरीवालांच्या पराभवासाठी मोठा प्लॅन; अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच झालं उघड

दरम्यान, दक्षता विभागाची निर्मिती करण्यात रामास्वामी यांचा वाटा मोठा होता. DOGE हा एक बिगर सरकारी टास्क फोर्स असून मस्क आणि रामास्वामी यांच्यावर त्याची जबाबदारी देण्यात आली होती. सरकारचा खर्च कमी करण्यासाठी प्रामुख्याने हा टास्क फोर्स काम करणार आहे. मस्क यांच्या नियुक्तीवरही वाद निर्माण झाला होता. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com