हिजाबच्या समर्थनार्थ अमेरिका मैदानात; भारताला ठणकावून सांगितले की...

कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयांतील हिजाब बंदीचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याचे समोर आले आहे.
Hijab
HijabSarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) आता हिजाबवरून (Hijab) वाद पेटला आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारवर शाळा (School) आणि महाविद्यालये (Colleges) काही दिवस बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आता या वादात अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने (USA) हिजाब हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग असल्याचे भारताला ठणकावून सांगितल आहे. यामुळे हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेने हिजाब बंदीवरून भारताचे कान टोचले आहेत. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य विभागाने म्हटले आहे की, हिजाब बंदीमुळे अल्पसंख्य महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा भंग होत आहे. याचबरोबर अल्पसंख्य महिला व मुलींना लक्ष्य केले जात आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ हा आपल्याला हवे ते धार्मिक वस्त्र निवडणे. भारतातील कर्नाटक राज्याने हिजाबवर बंदी घालणे चुकीचे आहे.

अमेरिकेने मांडलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात पडू लागल्याचे समोर आले आहे. हिजाब बंदीमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमेला धक्का बसू शकतो, असेही मानले जात आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने हिजाब बंदीवरून अंतरीम आदेश दिला आहे. न्यायालय या प्रकरणी अंतिम आदेश देईपर्यंत कोणतीही धार्मिक वस्त्रे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घालण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

Hijab
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल; शहराध्यक्षपदाची धुरा चिंचवडकडून भोसरीकडे

अनेक महाविद्यालयांमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थिनी आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेले विद्यार्थी समोरासमोर येऊन वाद होत होते. अनेक महाविद्यालयांमध्ये घोषणाबाजी आणि दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाविद्यालयांच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.

Hijab
रामदास कदमांना दे धक्का! दापोलीत नगराध्यक्ष अखेर अनिल परबांच्या गटाचाच

बुरखा बंदीच्या निर्णयावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. बोम्मई यांनी याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी बंदी घालणाऱ्या शाळा व महाविद्यालयांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com