Uttar Pradesh Politics BSP-SP : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आतापासूनच तयारी करण्यास सुरवात केली आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टी (बसपा) सोबत युती करण्याचा विचार समाजवादी पार्टीने (सपा) सोडून दिला आहे. मात्र, दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी सपाने संपूर्ण तयारी केलेली दिसते.
यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमात्ताने सपाने मोठे अभियान हाती घेतलं आहे. येत्या आंबेडकर जयंतीला या अभियानास सुरवात होणार आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून सोमवारी (ता.३) रायबरेली येथे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या हस्ते बसपाचे संस्थापक कांशीराम यांच्या प्रतिमेचे अनावरण होणार आहे.
या कार्यक्रमातील भाषणात अखिलेश यादव हे बसपा संस्थापक कांशीराम यांनी १९९३ मध्ये सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्यासोबत केलेल्या युतीची आठवण जनतेला करुन देणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थिती भाजपला हरविण्यासाठी सपा-बसपा यांनी एकत्र येणं कसे गरजेचे आहे, यावर अखिलेश यादव भाष्य करणार आहेत.
या अभियानाची माहिती देताना सपाचे राष्ट्रीय महासचिव स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम यांच्या विचारापासून बसपा आज दूर गेली आहे. कांशीराम आणि मुलायम यादव यांच्या समर्थकांनी नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे,"
येत्या लोकसभेत निवडणुकीत किमान बारा लोकसभा मतदार संघात ओबीसी, दलित मतांच्या आधारे सपा-बसपा गेम चेंजर ठरु शकेल, असा विश्वास अखिलेश यादव यांना आहे. 2021 मध्ये आंबेडकर जयंतीच्या दिवशी 'बाबासाहेब वाहिनी'ची स्थापना करणारी सपा सध्या अंतर्गत पक्ष बांधणीसाठी विविध योजना तयार करीत आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाकडून ज्या चुका झाल्या, त्यांची पुनरावृत्ती अखिलेश यादव यांना टाळायच्या आहेत, यासाठीच बसपासोबत निवडणूक न लढविता थेट बसपाच्या मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सपाने सुरू केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सपाने बसपाची साथ सोडली आहे. अखिलेश यादवाच्या प्रयत्नाला किती यश येते, हे काही दिवसातच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.