NCP Sarpanch Murdered : NCP सरपंच प्रवीण गोपाळे खूनप्रकरणी मोठी अपडेट ; चार संशयित ताब्यात.

Sarpanch Shirgaon Sarpanch Murdered : शनिवारी रात्री उशीरा प्रविण गोपाळे हे शिरगाव चौकातील साई मंदिरासमोर आले होते.
Pravin Gopale
Pravin Gopale Sarkarnama

Sarpanch Shirgaon Sarpanch Murdered : प्रतिशिर्डी समजल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यात कोयत्याने वार करून टोळक्याने शिरगावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांचा काल (शनिवारी) रात्री हल्ला करुन खून केला आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मोठी अपडेट येत आहे. गोपाळे खून प्रकरणी मावळ पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करीत आहे. शनिवारी रात्री उशीरा प्रविण गोपाळे हे शिरगाव चौकातील साई मंदिरासमोर आले होते.

Pravin Gopale
Karnataka election 2023 : जुने म्हैसूर ठरवणार कर्नाटकचा किंग कोण ? तिहेरी लढतीत कोण बाजी मारणार..

त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दोन जणांनी सुरवातीला नेमके ते कुठे आणि कोणासोबत आहे हे हेरले. त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा तीन जण दुचाकीवर त्याठिकाणी येऊन त्यांनी थेट टोळक्यानी धारदार कोयत्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Pravin Gopale
West Bengal : पोलीस ठाण्याजवळच BJP नेत्याची गोळ्या झाडून हत्या..

या हल्लानंतर गोपाळ यांनी येथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांना रस्त्यात गाठून हल्लेखोऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर कोयत्याने वार केले.

यात गोपाळे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र,त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात आहे.

हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत. आणखी दोन ते तीन जणांना आज अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

'हल्लेखोरांना अटक करा,' या मागणीसाठी गावकऱ्यांचे पोलिस चौकीसमोर सुरु असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. प्रवीण गोपाळे यांच्या मृतदेह त्यांच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com