Akhilesh Yadav : भाजपची मोठी खेळी; अखिलेश यादव यांच्या मेव्हण्याला दिले तिकीट

Karhal Assembly constituency: अखिलेश यादव यांच्या राजीनाम्यामुळे करहल विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे.
Akhlesh Yadav, Anijesh Yadav
Akhlesh Yadav, Anijesh YadavSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशात नऊ विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपसह समाजवादी पक्षाने कंबर कसली आहे. भाजपने आतापर्यंत सात उमेदवारांची घोषणा केली असून त्यापैकी एक उमेदवार सपाचे अध्यक्ष व खासदार अखिलेश यादव यांचा मेव्हणा आहे. त्यामुळे यादव कुटुंबातच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखिलेश हे करहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. अखिलेश यांनी त्यांच्याजागी त्यांचे भाचे आणि मैनपुरीचे माजी खासदार तेज प्रताप यादव यांना तिकीट दिले आहे.

Akhlesh Yadav, Anijesh Yadav
Priyanka Gandhi : प्रियांका तुमच्यापेक्षा चांगल्या खासदार ठरू शकतात का? गुगलीवर राहुल चाचपडले अन्... VIDEO

भाजपने अखिलेश यांना कोंडीत पकडत मोठा डाव टाकला आहे. करहल मतदारसंघात अनुजेश यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुजेश हे मुलायम सिंह यांच्या कुटुंबाचे जावई आहेत. मुलायम सिंह यांची पुतणी संध्या यादव यांचे ते पती आहेत.

संध्या यादव या आझमगढचे खासदार धर्मेंद्र यादव यांच्या भगिनी आहेत. संध्या आणि अनुजेश यांना समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अनुजेश यांच्या उमेदवारीमुळे यादव कुटुंबातच लढत होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. करहल मतदारसंघ यादव कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. तिथे कुटुंबातील सदस्यच एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने ही लढत कोण जिंकणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Akhlesh Yadav, Anijesh Yadav
Jagan Mohan Reddy : सत्ता जाताच जगनमोहन यांनी बहिणीला खेचलं कोर्टात; नेमकं काय घडलं?

दरम्यान, अनुजेश यादव यांचे कुटुंबही राजकारणाशी जोडले गेले आहे. त्यांच्या आई उर्मिला यादव या मैनपुरीतील घिरोर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार होत्या. समाजवादी पक्षाच्या तिकीटावरच त्या निवडून आल्या होत्या. आता त्यांचे अनुजेश पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com