Priyanka Gandhi : प्रियांका तुमच्यापेक्षा चांगल्या खासदार ठरू शकतात का? गुगलीवर राहुल चाचपडले अन्... VIDEO

Wayanad Lok Sabha Bypoll Election : प्रियांका गांधी यांनी बुधवारी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Rahul Gandhi, Priyanka GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress News: वायनाड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा गांधी कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघ सोडल्यानंतर त्यांच्याजागी काँग्रेसने त्यांच्या भगिनी प्रियांका गांधींना उमेदवारी दिली आहे. त्यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहुल, प्रियांका यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एका बसमधून जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. राहुल यांनीही हा व्हिडिओ ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना प्रियांका गांधी या वायनाडसाठी राहुल यांच्यापेक्षा चांगल्या खासदार ठरू शकतात का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Jagan Mohan Reddy : सत्ता जाताच जगनमोहन यांनी बहिणीला खेचलं कोर्टात; नेमकं काय घडलं?

या प्रश्नावर राहुल गांधी सुरूवातीला चाचपडल्याचे दिसते. हा खूपच अवघड प्रश्न असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर मात्र लगेच मला तसं वाटत नाही, असे म्हणत त्यांनी आपणच वायनाडसाठी चांगले खासदार होतो, असे सूचकपणे सांगण्याचा प्रयत्न केला.

जवळपास एक मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये बहीण-भावांमध्ये वायनाडबाबत संवाद सुरू असल्याचे दिसते. राहुल हे 2019 ते 2024 दरम्यान या मतदारसंघाचे खासदार होते. या व्हिडिओमध्ये सुरूवातीला प्रियांका राहुल यांना तू असा चेहरा का केला आहेस, असा प्रश्न विचारतात. त्यावर राहुल थोडे भावनिक होऊन मला वायनाडची सतत आठवण येईल, अशी प्रतिक्रिया दिली.

Rahul Gandhi, Priyanka Gandhi
Priyanka Gandhi: पहिलीच निवडणूक, आई अन् भावासोबत 'रोड शो', उमेदवारी अर्ज भरताना प्रियांका गांधी भावूक; म्हणाल्या...

वायनाडच्या खासदारकीसाठी स्वत: सोडून कुणाची निवड कराल, असे विचारल्यानंतर राहुल यांनी लगेच प्रियांका यांचे नाव घेतले. त्यावर खुलासा करताना ते म्हणतात, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे म्हणून असे बोलत नाही. तर ती खरंच खूप चांगले काम करेल. तिच्यामध्ये खूप गुण आहेत. ती एखाद्या गोष्टीचा खूप खोलवर अभ्यास करते. आणि ती माझी बहीण आहे.

वायनाडला दोन खासदार

वायनाडविषयी जिव्हाळा व्यक्त करताना राहुल यांनी वायनाडला दोन खासदार असतील, असे म्हटले. देशातील हा एकमेव मतदारसंघ असा असेल. एक खासदार अधिकृत आणि दुसरे अनधिकृत. दोन्ही खासदार एकत्रितपणे वायनाडमधील लोकांच्या भावनांचे रक्षण करेल, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com