मेधा सोमय्या उचलणार मोठं पाऊल; राऊतांना आणणार जेरीस

राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे.
Kirit Somaiya, Medha Somaiya and Neil Somaiya
Kirit Somaiya, Medha Somaiya and Neil SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याविरोधात राऊतांविरोधा मानहानीचा दावा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढणार आहे. (Kirit somaiya Latest Marathi News)

राऊतांविरोधात सोमय्या कुटुंबीयांनी नुकतीच पोलिसांत धाव घेतली होती. कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक वक्तव्य केली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण अद्याप पोलिसांकडून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (Medha Somaiya will file Criminal Defamation Suit against Shiv Sena MP Sanjay Raut)

Kirit Somaiya, Medha Somaiya and Neil Somaiya
काँग्रेसचं ठरलं! अखेर तिकीट वाटप अन् पदांबाबत घेतला मोठा निर्णय

त्यानंतर आता मेधा सोमय्या न्यायालयात धाव घेणार आहे. येत्या 18 मे रोजी मुंबईतील शिवडी येथील न्यायालयात राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला जाणार आहे. शंभर कोटींच्या शौचालय घोटाळा केल्याचा राऊतांचा आरोप महिलेवर दबाव टाकण्यासाठी आहे. त्यांच्याकडे याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे न्यायालयात जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

काय दिलीय पोलिसांत तक्रार?

मेधा सोमय्या यांनी याबाबतचा तक्रार अर्ज मुंलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. राऊतांवर त्यांनी धमकावण्याचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. राऊत यांनी माध्यमांमध्ये दुर्भाग्यपूर्ण आणि अयोग्य भाष्य केलं आहे. त्यांनी केवळ आपलं चारित्र्यहनन केलं नाही तर मला घाबरवलं आणि धमकावलंही आहे, असं तक्रार अर्ज म्हटलं आहे.

याआधी मेधा सोमय्या यांनी राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली होती. राऊतांनी 48 तासांत माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करू, असं नोटीसीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर आता न्यायालयातही दावा दाखल केला जाईल.

दरम्यान, संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे, अन्यथा माफी मागणी, असे मेधा सोमय्या यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले होते. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com