Yogi Adityanath
Yogi AdityanathSarkarnama

CM योगी आदित्यनाथांचा आणखी एक रेकॉर्ड; मुलायम सिंह यादव, मायावती,अखिलेश यादव जवळपासही नाहीत...

Yogi Adityanath Becomes Long Serving CM of Uttar Pradesh: विधान भवनावर सलग आठवेळा ध्वजवंदन करणारे योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री चौधरी चरण सिंह, मुलायम सिंह यादव, मायावती आणि अखिलेश यादव हे योगी यांना ही संधी मिळाली नाही.
Published on

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवीन रेकॉर्ड स्थापन केले आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक कार्यकाळ सांभाळणारे मुख्यमंत्री ठरले आहेत. सलग 7 वर्ष 148 दिवस मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्यापूर्वी काँग्रेसचे मुख्यमंत्री डॉ. संपूर्णानंद हे सर्वाधिक कार्यकाळ मुख्यमंत्रीपदावर होते

विधान भवनावर सलग 8 वेळा ध्वजवंदन करणारे योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. माजी मुख्यमंत्री चौधरी चरण सिंह, मुलायम सिंह यादव, मायावती आणि अखिलेश यादव हे योगी यांना ही संधी मिळाली नाही.

मायावती यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, मुलायम सिंह यांनी तीन वेळा शपथ घेतली पण त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या एवढी लोकप्रियता मिळाली नाही. मायावती यांनी चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण त्यांचा कार्यकाळ 7 वर्ष 16 दिवस राहिला. मुलायम सिंह यादव तीन वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष 274 दिवस होता.

25 मार्च 2022 रोजी योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी नारायण दत्त तिवारी यांचे 37 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तोडले होते. योगी आदित्यनाथ पहिले मुख्यमंत्री आहेत, जे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

2022मध्ये ४० वर्षात पहिल्यांदाच उत्तर प्रदेश विधान परिषदेत एका पक्षाला बहुमत मिळालं आहे. भाजपच्या नावावर हा रेकॉर्ड नोंद झाला आहे. याआधी १९८२ मध्ये काँग्रेसकडे पूर्ण बहुमत होते. उत्तर प्रदेश विधान परिषदेत १०० जागा आहेत. त्यातील ३६ जागांवर निवडणुका घेण्यात आल्या.

Yogi Adityanath
Raju Todsam: विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच विदर्भातील बडा नेता बाद?

यातील ९ जागा भाजपानं बिनविरोध जिंकल्या आहेत. तर २७ जागांवर मतदान घेण्यात आले. त्यातील २४ जागांवर भाजपाला विजय मिळाला आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.विधान परिषदेत बहुमताचा आकडा ५१ आहे. आता भाजपाचे एकूण ६७ आमदार विधान परिषदेत आहे. म्हणजे बहुमतापेक्षा १६ जागा भाजपाकडे जास्त आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com