Raju Todsam: विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यापूर्वीच विदर्भातील बडा नेता बाद?

Yavatmal News Former MLA Raju Todsam:29 यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आंदोलनाला हिंसक वळणं दिल्याप्रकरणी यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघाचे राजू तोडसाम यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Raju Todsam
Raju TodsamSarkarnama
Published on
Updated on

शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी 2022 मध्ये केळापूर सत्र न्यायालयाने माजी आमदार राजू तोडसाम यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या दोषारोपपत्राला स्थगिती मिळवण्यासाठी राजू तोडसाम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विनंती अर्ज दाखल केला होता.हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

या निर्णयामुळे राजू तोडसाम (Raju Todsam)यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवता येणार नाही. त्यांना आता निर्णयावर स्थगिती मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घावी लागणार आहे.

29 नोव्हेंबर 2013 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आंदोलनाला हिंसक वळणं दिल्या प्रकरणी यवतमाळच्या आर्णी विधानसभा मतदारसंघाचे राजू तोडसाम यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणात डिसेंबर 2022 मध्ये केळापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरवत त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती.

यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाचा हरास सुरू असताना राजू तोडसाम त्या ठिकाणी आले. त्यांनी व्यापारी भाव बरोबर देत नाही, काट्यात हेराफेरी होत असल्याचा आरोप करून त्या ठिकाणी राडा केला व कापसाचा हरास बंद पाडला होता.

त्यानंतर आरोपींनी पेट्रोलची कॅन आणि लाट्या काठ्या घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर त्यांनी इमारतीची तोडफोड केली व पेट्रोल टाकून इमारतीला आग लावली. या तोडफोडीत आणि आगीत बाजार समितीच्या खुर्च्या, भिंतीवरचे पंखे, एलईडी स्क्रीन यासह 3 लाख 61 हजार रुपये किमतीच्या सामानाचे नुकसान झाले होते. तर 1 लाख 12 हजार रुपयाचे सामान चोरून नेले होते.

Raju Todsam
Video Raju Shetti: तिसऱ्या आघाडीसाठी राजू शेट्टींच्या हालचाली वाढल्या; महायुती-आघाडीची डोकेदुखी वाढणार!

असाच एक गुन्हा तोडसाम यांच्यावर दाखल आहे.2013 मध्ये पांढरकवडा इथल्या महावितरण कार्यालयातील लेखापालाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने 2015 मध्ये राजू तोडसाम यांना सुनावलेली तीन महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली होती. त्यानंतर राजू तोडसाम यांची रवानगी यवतमाळ कारागृहात करण्यात आली होती.

काही लोकांचं वाढीव बिल कमी करण्यासाठी 17 डिसेंबर 2013 रोजी राजू तोडसाम आपल्या समर्थकांसह पांढरकवडा इथल्या वीज वितरण कार्यालयात गेले होते. यावेळी तिथल्या लेखापालाशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये वाद वाढला. यानंतर राजू तोडसाम यांनी आपल्याला शिवीगाळ करुन मारहाण केली, अशी तक्रार लेखापालने पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

वादग्रस्त असलेले आमदार राजू तोडसाम यांचे तिकीट भाजपने कापले होते. भाजपाने त्यांच्या जागी डॉ. संदीप धुर्वे यांना तिकीट दिले होते. तोडसाम यांनी बंडखोरी केली. अपक्ष म्हणून निवडणूक लढले, तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com