मोदी, शहा, नड्डा, गडकरी उत्तराखंडमध्ये स्टार प्रचारक ; 30 जणांची यादी जाहीर

भाजपने ३० स्टार प्रचाराकांची यादी प्रसिद्ध केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपली जन्मभूमी उत्तराखंडमध्ये प्रचारात उतरणार आहेत.
मोदी, शहा, नड्डा, गडकरी उत्तराखंडमध्ये स्टार प्रचारक ; 30 जणांची यादी जाहीर
sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी (Uttarakhand Assembly Election 2022) भाजपने ३० स्टार प्रचाराकांची यादी प्रसिद्ध केली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपली जन्मभूमी उत्तराखंडमध्ये प्रचारात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, प्रल्हाद जोशी आदी नेत्यांची नावे या ३० स्टार प्रचाराकामध्ये आहेत.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उत्तराखंडच्या प्रचारात स्टार प्रचारक आहेत. भाजपा राष्ट्रीय महासचिव आणि उत्तराखंडचे प्रभारी दुष्यंत गौतम, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक, केंद्रीयमंत्री जनरल वी के सिंह, राज्यमंत्री अजय भट्ट आणि भाजपा राष्ट्रीय मीडियाचे प्रभारी अनिल बलूनी हेही उत्तरांखड येथे प्रचारासाठी येणार आहेत.

माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, त्रिवेंद्र सिंह रावत, रमेश पोखरियाल निशंक,विजय बहुगुणा, रेखा वर्मा, लॉकेट चटर्जी, सरदार आरपी सिंह , अजय कुमार, अजय टम्टा, माला राज्यलक्ष्मी शाह, नरेश बंसल, नायाब सिंह सैनी, मंत्री सतपाल महाराज , बलराज पासी, खासदार मनोज तिवारी हेही निवडणुकीच्या रॅली, सभांमध्ये सहभागी होणार आहेत.

मोदी, शहा, नड्डा, गडकरी उत्तराखंडमध्ये स्टार प्रचारक ; 30 जणांची यादी जाहीर
मोदींनी पेगासस घेण्यासाठी करदात्यांचा पैसा वापरला ; आव्हाडांचा घणाघात

उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठी येथे १४ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. 10 मार्च रोजी निकाल आहे. उत्तराखंड या पहाडी राज्यात (उत्तराखंड निवडणूक 2022) भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात हे स्पष्ट झालं आहे.

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉग्रेसने शनिवारी ५३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कॉग्रेसने (Congress) यादी जाहीर करताच दुसऱ्या दिवसापासून कॉग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत अनेक जण आहेत. रविवारी रात्री उत्तरकाशी यमुनोत्री विधानसभा (Yamunotri Assembly seat) मतदार संघात कॉग्रेसमध्ये मोठी फूट पडली. सुमारे दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.

मोदी, शहा, नड्डा, गडकरी उत्तराखंडमध्ये स्टार प्रचारक ; 30 जणांची यादी जाहीर
गोवा विधानसभेसाठी ५८७ अर्ज दाखल

यमुनोत्री विधानसभा मतदार संघात कॉग्रेसच्या ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष संजय डोभाल (Sanjay Doval)यांना कॉग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक जणांना यावेळी गहीवरुन आले. डोभाल यांना कॉग्रेसने तिकीट नाकारल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. डोभाल यांनी २०१७ मध्ये निवडणुक लढविली होती. यात त्याचा पराभव झाला होता. त्यांना १३ हजार ६०० मते मिळाली होती. ते दुसऱ्या स्थानावर होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com