कंगना मूर्ख की देशद्रोही? भाजप खासदारानेच काढले वाभाडे

कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान.
kangna ranaut
kangna ranautSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले होते. खरे स्वातंत्र्य तर २०१४ मध्येच मिळाले, या आपल्या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना रानावत (Kangana Ranaut) आता वादात सापडली आहे. एका परिषदेत बोलताना तिने हे वक्तव्य केले होते. तिच्या या वक्तव्यावर अनेक काँग्रेस नेत्यांसह अभिनेत्री स्वरा भास्कर, माजी सनदी अधिकारी सुर्यप्रताप सिंह यांनी टिका केली आहे. कंगनाच्या याच वक्तव्यावरुन भाजपचे खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांनीही निशाणा साधला आहे.

kangna ranaut
कंगनाची तक्रार राष्ट्रपतींकडे करणार ; नीलम गोऱ्हे संतापल्या

या संदर्भात वरुण गांधी यांनी ट्वीट केले आहे. वरुण गांधींनी कंगानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर ते म्हणाले, विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह असा सवाल गांधी यांनी उपस्थित केला आहे. ''कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?'' असा सवाल उपस्थित करत वरुण गांधी यांनी कंगानाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

kangna ranaut
कंगनासारख्या वाढत चाललेल्या मूर्खावळीला आवर घालायला हवा...

दरम्यान, सन्मानीय राष्ट्रपती महोदयांनी कंगना राणावत ला नुकताच पदम पुरस्कार प्रदान केला. त्याच्यानंतर कंगना राणावत हिने अत्यंत बेजबाबदर, निराधार आणि स्वातंत्र्य योधांचा अपमान करणारे विधान केले आहे. त्याचा निषेध करते, असे विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोर्हे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असणारी त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी कंगना राणावतने 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन संमरपित करणाऱ्या योध्यानच अपमान केला आहे. स्वातंत्र्य लढ्याचा अपमान केला. त्यामुळे तिचा पदम पुरस्कार ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी विनंती मी राष्ट्रपतींना करणार असल्याचे गोर्हे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com