Congress News : काँग्रेसला आणखी एक धक्का; माजी पंतप्रधानांच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश

BJP Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विभाकर शास्त्री यांनी बुधवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने धक्का बसला आहे.
Vibhakar Shastri
Vibhakar Shastrisarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. (Vibhakar Shastri News)

विभाकर शास्त्री यांनी बुधवारी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विभाकर शास्त्री काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना उद्देशून ट्विट करत आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

Vibhakar Shastri
Rajya Sabha Election 2024 : भाजपकडून पाच उमेदवारांची नावे जाहीर; दोन केंद्रीय मंत्री मैदानात

काँग्रेसच्या वर्किंग कमिटीमध्ये स्थान न मिळाल्याने विभाकर शास्त्री नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. पक्षाच्या अनेक महत्वाची पदे त्यांनी सांभाळली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे ते सल्लागारही होते. त्यामुळे काँग्रेससाठी हा धक्का मानला जात आहे.

विभाकर शास्त्री यांनी 1998 मध्ये उत्तर प्रदेशाती फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांना केवळ 24 हजार 688 मते मिळाली. त्यानंतर पुन्हा 1999 मध्ये निवडणुकीत उतरले. त्यावेळी पराभव झाल्याने ते सक्रीय राजकारणातून काहीसे दूर गेले. पुन्हा दहा वर्षांनी म्हणजे 2009 मध्ये निवडणुकीत नशीब आजमावलं. यावेळी त्यांना पराभूत व्हावे लागले.      

अशोक चव्हाण कालच भाजपमध्ये

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी सोमवारी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. त्यांच्यामागे आणखी काही समर्थक आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vibhakar Shastri
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला, चंद्रकांत हंडोरेंना संधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com