Rajya Sabha : आईच्या आठवणीने उपराष्ट्रपती नायडूंना अश्रू अनावर...

Venkaiah Naidu : आज राज्यसभेत वेंकय्या नायडू यांना निरोप देण्यात आला
Venkaiah Naidu
Venkaiah Naidusarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : एका गावात एका शेतकरी कुटुंबाकडे ८ बैल होते. एके दिवशी त्यातील एक बैल पिसाळला त्याने महिलेच्या पोटात शिंग मारले. त्यावेळी तिच्या कडेवर अवघ्या एका वर्षाचा मुलगा होता. त्या महिलेचा उपचारा दरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला. तिचा मुलगा पुढे जाऊन भारताचा उपराष्ट्रपती झाला....त्यांचेच नाव वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu). राज्यसभेत (Rajya Sabha) आजच्या निरोप समारंभात या घटनेचा उल्लेख होताच नायडू यांना आईच्या आटवणीने अश्रू अनावर झाले. ते रूमालाने डोळे पुसू लागले. काही मिनिटांतच त्यांनी स्वतःला सावरले.

नायडू यांच्या निरोप समारंभासाठी आज राज्यसभेचे उर्वरीत कामकाज एक विधेयक वगळता रद्द करण्यात आले. नायडू यांच्याबद्दल पंतप्रधानांपासून विविध पक्षीय ३० नेत्यांनी गौरवाच्या भावना व्यक्त केल्या. नायडू यांनी ज्या युवा खासदारांना विशेष संधी दिली त्यातील जॉन ब्रेटस (माकप) सस्मित पात्रा (बीजू जनता दल), राघव चढ्ढा (आप) प्रा. मनोज कुमार झा (राजद) आदींनी त्यांच्या आठवणी सांगितल्या, नायडू यांनी वेळेवेळी पत्र पाठवून दिलेले प्रोत्साहन यांचा खास उल्लेख यावेळी सर्वांनी केला.

Venkaiah Naidu
Bihar : महाराष्ट्रानंतर आता या राज्यात होणार राजकीय भूकंप : भाजपसोबतची युती तोडणार ?

नायडू यांनी समारोपाच्या संक्षिप्त भाषणातही गदारोळाबद्दल नापसंती व्यक्त केली. कामकाज बंद पाडण्यापेक्षा कामकाजात सहभागी होऊन जर सरकारला कोंडीत पकडले तर ती मोठी घटना ठरते, असे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यमांनीही केवळ सनसनाटीपणाच्या मागे पळण्याऐवजी संसद कारवाईतील गंभीर विषयांना प्रसिध्दी द्यावी, अशा कानपिचतक्या त्यांनी दिला. गेल्या काही वर्षांत भारताचा जगभरात सन्मान वाढला आहे. त्यामुळे संसदेवरील जबाबदारीही वाढली आहे, ती खासदारंनी लक्षात घेणे गरजेचे असल्याचेही नायडू म्हणाले.

Venkaiah Naidu
नरेंद्र मोदी खरंच ओबीसी आहेत का? : नाना पटोलेंनी उपस्थित केला प्रश्न

संसदेतील सध्याचे सर्वांत युवा खासदार असलेले राघव चढ्डा यांनी, पहिले प्रेम माणसाच्या आयुष्यभर लक्षात रहाते. तसेच माझ्या आयुष्यातील पहिल्या संसद सदस्यपदाच्या काळातील पहिले सभापती म्हणून तुमचे मार्गदर्शन कायम लक्षात राहील असे सागितले. त्यावर नायडू उत्तरले, राघव, माझ्या माहितीनुसार फक्त पहिलेच प्रेम ना? दुसरे तिसरे असे त्यापुढे काही नसावे! यावर सभागृहात हास्यकल्लेळ झाला. राघव चढ्ढा म्हणाले की सर, माझा एवढा अनुभव नाही. त्यावर नायडू हसतहसत उत्तरले, पहिले प्रेमच महत्वाचे असते. तेच कायम ठेवायचे असते, पूर्ण आयुष्यभर! त्यावर पंतप्रधानांसह उपस्थितांना पुन्हा हसू अनावर झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com