Bjp Mla Viral Video : भाजप आमदाराचा कारनामा; विधानसभेत पाहत होते पोर्न व्हिडीओ : व्हिडीओ व्हायरल

Tripura Bjp Mla viral Video : भाजपच्या एका आमदाराच्या व्हिडीओमुळे पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे.
BJP Mla Jadab Lal Nath
BJP Mla Jadab Lal NathSarkarnama
Published on
Updated on

BJP Mla Jadab Lal Nath News : भाजपच्या एका आमदाराच्या व्हिडीओमुळे पक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना खुर्चीवर बसून भाजपचा (BJP) आमदार पोर्न व्हिडीओ पाहत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे या आमदारावर टीका होतच आहे. मात्र, या प्रकारामुळे भाजपचीही चांगलीच नाचक्की झाली आहे.

हा व्हायरल व्हिडीओ 27 मार्चचा असल्याचे सांगितले जात आहे. त्रिपुरातील (Tripura) बागबासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जादब लाल नाथ (Jadab Lal Nath) हे विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना पोर्न व्हिडीओ पाहताना दिसून आले आहेत. जादब लाल नाथ विधानसभेत मोबाईलवर पोर्न व्हिडीओ पाहताना दिसत असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ त्यांच्या पाठीमागे बसलेल्या आमदारांनी व्हायरल केल्याचे सांगितले जात आहेत. तर काही मीडिया रिर्पोटच्या मते हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

BJP Mla Jadab Lal Nath
Amit Shah Interview : राहुल गांधी न्यायालयात जाऊ शकले असते, पण इतकी मुजोरी येते कुठून? अमित शाहंचा सवाल!

या व्हारल व्हिडीओवर जादब लाल नाथ यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. या व्हिडिओमुळे ते चांगलीच अडचणीत आले आहे. शिवाय हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत, असल्यामुळे भाजपही ट्रोल होत आहे. त्रिपुरा प्रदेश युवक काँग्रेसने आपल्या ट्वीटर वरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे.

BJP Mla Jadab Lal Nath
BV Srinivas Defamation Notice: स्मृती ईराणींना 'डार्लिंग' म्हणणं काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या अंगलट; Video पाहा; डार्लिंग बना कर…

जादब लाल नाथ हे बागबासा विधानसा मतदारसंघातील आमदार आहेत. सीपीएमचा बालेकिल्ला असलेल्या बागबासामधून त्यांनी भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत त्यांनी बिजिता नाथ यांना 1 हजार 400 मतांच्या फरकाने पराभूत केले होते. यावेळी तृणमूलचे बिमल नाथ तिसऱ्या तर टिपरा मोथा पार्टीच्या कल्पना सिन्हा चौथ्या क्रमांकावर होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com