Vijay Mallya on RCB : विजय मल्ल्याने 'RCB'बद्दल केला मोठा खुलासा; २००८ मध्ये संघ खरेदी करण्यामागचं खरं कारणही सांगितलं!

Vijay Mallya reveals the real reason behind buying RCB in IPL 2008 : विजय मल्ल्याने सुरुवातीस मुंबई इंडियन्ससह आणखी दोन संघासाठी बोली लावली होती, मात्र...
Vijay Mallya opens up about the real reason for buying the Royal Challengers Bangalore franchise in IPL 2008
Vijay Mallya opens up about the real reason for buying the Royal Challengers Bangalore franchise in IPL 2008sarkarnama
Published on
Updated on

Why Vijay Mallya Bought RCB in IPL 2008 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेर १८ वर्षानंतर आयपीएलचा विजयी चषक जिंकला. पंजाब किंग्ज संघाचा आरसीबीने अंतिम सामन्यात सहा धावांन पराभव केला होता. या प्रदीर्घ कालावधीत आरसीबी संघात अनेक दिग्गज खेळाडू आले आण गेले. मात्र एक खेळाडू सलग १८ वर्षे या संघासोबत कायम होता, तो म्हणजे विराट कोहली. आरसबीच्या विजयानंतर सर्वाधिक चर्चा आणि मीडियाचा फोकस विराटवर होता. त्याचबरोबर आरसीबीचा सर्वात पहिला मालक फरार असलेला विजय मल्ल्याही यानिमित्त चर्चेत आला.

भारतासाठी वाँटेड असणाऱ्या फरार विजय मल्ल्याने एक पॉडकास्टमध्ये आयपीएलबाबत काही खुलासे केले आहेत. ज्यामध्ये त्याने म्हटले की, त्याने मुंबई इंडियन्ससह एकूण तीन फ्रँचायझींसाठी बोली लावली होती. मात्र  मुंबई इंडियन्सन संघ मुकेश अंबानीने विकत घेतला. त्यानंतर मग विजय मल्ल्याने अखेर २००८मध्ये आरसीबीला ११२ दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतले, जे त्यावेळी ६०० ते ७०० कोटींच्या बरोबरीचे होते.

मल्ल्याने सांगितले की, ललित मोदी यांनी बीसीसीआय़ समितीला या लीगबद्दल दिलेल्या सल्ल्याने मी खूप प्रभावित झालो होतो. त्यांनी एकेदिवशी मला फोन केला व सांगितले की संघाचा लिलाव होणार आहे, तुम्हाला ते खरेदी करायचे आहेत का? मी म्हणालो ठीक आहे, मी तीन फ्रँचायझींवर बोली लावली व मी मुंबईकडून खूपच कमी पैशात हरलो.

Vijay Mallya opens up about the real reason for buying the Royal Challengers Bangalore franchise in IPL 2008
Dilipkumar Sananda : खामगावात पॉलिटिकल ट्वीस्ट! दिलीपकुमार सानंदा देणार भाजप नेत्यांना पक्षप्रवेश समारंभाचे निमंत्रण

तसेच, मी जेव्हा २००८मध्ये आरसीबीसाठी बोली लावली तेव्हा मी आयपीएलला भारतीय क्रिकेटसाठी गेमचेंजर म्हणून बघितले. माझा उद्देश बंगळुरूच्या भावनेला मूर्त रूप देणारा संघ तयार करणे होता. मी अखेर ११२ दशलक्ष डॉलर्सची बोली लावली, जी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बोली होती.

मला आरसीबी ब्रँड बनवायचा होता, जो केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही ओळखला जातो. म्हणून मी तो रॉयल चॅलेंजशी जोडला, जे आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मद्य ब्रँडपैकी एक आहे. ज्यामुळे त्याला आणखी मजबूत ओळख मिळेल. एवढचं नाहीतर मल्ल्याने सांगितले की, आरसीबी खरेदी करण्यामागचं एकमेव कारण व्हिस्की ब्रँडचा प्रचार करणे होतं. यामागे क्रिकेटबद्दल कोणतीही विशेष प्रेम नव्हतं.

Vijay Mallya opens up about the real reason for buying the Royal Challengers Bangalore franchise in IPL 2008
Donald Trump decision : ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय! आता ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत 'No Entry'

अखेर शेवटी मल्याला विचारलं गेलं की जर आच आरसीबीचा संघ निवडण्याची संधी मिळाली तर, कोणत्या खेळाडूंची तुम्ही निवड कराल? तेव्हा मल्ल्याने जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची नावे घेतली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com