Dilipkumar Sananda : खामगावात पॉलिटिकल ट्वीस्ट! दिलीपकुमार सानंदा देणार भाजप नेत्यांना पक्षप्रवेश समारंभाचे निमंत्रण

Dilipkumar Sananda to invite BJP leaders for political entry ceremony : आगामी काळात खामगावात महायुतीतील संघर्ष टळणार की वाढणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.
Dilipkumar Sananda
Dilipkumar Sanandasarkarnama
Published on
Updated on

Khamgaon Mahayuti politics : खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दोन राजकीय कट्टर विरोधक आता एकत्र येणार आहेत. काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्था निर्माण झाली आहे. एका म्यानात दोन तलवारी कशा बसणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मात्र हा संघर्ष टाळण्यासाठी स्वतः सानंदा यांनीच पुढाकार घेतला आहे. पक्ष प्रवेश समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आपण भाजप आणि महायुतीच्या सर्व नेत्यांकडे जाऊन निमंत्रण देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांची अडचण झाली झाली आहे. तर या समारंभाला कोण जाणार, कोण नाही याची उत्सुकता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

आकाश फुंडकर सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. कामगार खाते त्यांना सोपवण्यात आले आहे. सानंदा या मतरसंघातून सलग तीन वेळा निवडूण आले होते. आकाश फुंडकरांनी मात्र त्यांना विजयाचा चौकार मारण्यापासून रोखले होते. त्यानंतर फुंडकर यांनीही विजयाची हॅटट्रिक केली आहे. तर तीनवेळा पराभव व काँग्रेसचे भवितव्य नसल्याचे दिसत असल्याने सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

Dilipkumar Sananda
Imran Khan : इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या मागे का लागले? पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर!

१२ जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत खामगावमध्ये प्रवेश समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. हा समारंभ भव्यदिव्य करण्यासाठी सानंदा व त्यांच्या समर्थकांचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण शहरावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. याकरिता एक हेलीकॅप्टरही बुक करण्यात आले आहे. याच हेलिकॅप्टरने माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीस्थळी पृष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचा संदेश दिला जाणार आहे.

Dilipkumar Sananda
Donald Trump decision : ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय! आता ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत 'No Entry'

असे असले तरी सानंदा यांनी युती धर्म पाळण्यासाठी आपण स्वतः महायुतीच्या नेत्यांची घरी जाऊन कार्यक्रमांचे निमंत्रम देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरावती विभागाचे समन्वयक, आमदार संजय खोडके यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती एकत्रच लढणार असल्याचे सांगून दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली असल्याचे दिसते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com