Rahul Gandhi vs Vijay : 2029 मध्ये काहीतरी जादू होईल, अन् विजय..! राहुल गांधींचे नाव घेत मित्रपक्षाच्या आमदाराचा धक्कादायक दावा

Vijay PM 2029, Rahul Gandhi Vijay, TVK MLA Kanimozhi Santhosh : टीव्हीके आमदार कनीमोझी यांचा दावा; २०२९ मध्ये ‘जादू’ होऊन राहुल गांधी स्वतः विजय यांना पंतप्रधानपदासाठी पुढे करतील, काँग्रेस-टीव्हीकेमध्ये तणाव.
Rahul Gandhi, C. Vijay
Rahul Gandhi, C. VijaySarkarnama
Published on
Updated on

Congress TVK alliance news : काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांना प्रोजेक्ट केले जात आहे. पण मित्रपक्षालाच राहुल गांधी नको आहेत. तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे दोन आमदारही ही सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, त्यानंतरही विजय यांच्या टीव्हीके पक्षातील नेत्यांकडून राहुल गांधी यांच्याविरोधात विधाने केली जात आहेत.

विजय हेच २०२९ मध्ये पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे टीव्हीके पक्षाचे नेते म्हणत आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधीच त्यासाठी पुढाकार घेतील, असेही नेते म्हणत आहेत. टीव्हीकेच्या आमदार कनीमोझी संतोष यांनी याबाबत धक्कादायक विधान केले आहे.

पंतप्रधान कोण असतील, हे दिल्ली ठरविणार नाही. तामिळनाडू ठरवेल. २०२९ मध्ये विजय हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. २०२९ मध्ये काहीतरी जादू होईल आणि राहुल गांधी स्वत: विजय यांना पंतप्रधान करतील, असे कनीमोझी म्हणाले आहेत. यावरून काँग्रेसने टीव्हीकेच्या नेत्यांना खडसावले आहे.

काँग्रेसचे तामिळनाडू विधिमंडळ पक्षाचे नेते थराहई कथबेर्ट यांनी सोमवारी म्हटले होते की, राहुल गांधी यांना आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देण्याचा निर्णय विजय यांनी घेतला आहे. विजय यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणणे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, पक्षनेतृत्वाला तसे वाटत नाही.

दरम्यान, राहुल गांधी आणि विजय हे चांगले मित्र असल्याचे सांगितले जाते. विजय यांच्या शपथविधीवेळी राहुल यांनी त्यांचा 'ब्रदर' असा उल्लेख केला होता. तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका केली नव्हती.

विजय यांना अधिकच्या जागा मिळाल्यानंतर काही तासांतच काँग्रेसने त्यांना सरकार स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, आता पंतप्रधान पदावरून दोन्ही पक्षातील नेते आमनेसामने उभे ठाकल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com