V K Saxena News : दिल्लीत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात आता उपराज्यपाल अ‍ॅक्शन मोडवर

V K Saxena on Bangladeshi illegal citizen : मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना दिले 'हे' निर्देश ; बांगलादेशात भारतीयांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत.
Vinay Kumar Saxena
Vinay Kumar Saxenasarkarnama
Published on
Updated on

V K Saxena News : दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना पत्र लिहून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात कडक करावाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

उपराज्यपालांनी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना सूचना केली आहे की, दोन महिने विशेष अभियान चालवून, दिल्लीतील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची ओळख पटवून त्यांच्यावर वेळेवर कारवाई करा. या अभियानामागे एका प्रतिनिधीमंडळाद्वारे दिल्या गेलेल्या निवेदनाचे प्रमुख कारण आहे.

यामध्ये दर्गाह हजरत निजामुद्दीन आणि बस्ती हजरत निजामुद्दीनचे मुस्लिम नेते सहभागी होते. त्यांनी बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. याप्रकारे राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बांगलादेशी(Bangladesh) घुसखोरांविरोधात कडक कारवाईची मागणी केली होती.

Vinay Kumar Saxena
German citizen MLA : जर्मनीचा नागरिक अन् भारतात तब्बल चारवेळा झाला आमदार; अखेर सत्य उघड झाले अन्...

या पत्रात म्हटले गेले आहे की, प्रमुख उलेमा आणि मुस्लिम(muslim) रहिवाशांनी मागणी केली आहे की, बांगलादेशी घुसखोरांना कोणीही भाड्याने राहण्यास घर दिले नाही पाहीजे आणि रोजगार दिला नाही पाहीजे. याशिवाय त्यांच्या मुलांना कोणत्याही खासगी शाळेने प्रवेशही दिला नाही पाहीजे.

Vinay Kumar Saxena
Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांच्याविरोधात ‘INDIA’ने उचललं ऐतिहासिक पाऊल; अखेर काँग्रेसनं संधी साधली...

मुस्लिम नेत्यांनी ही देखील मागणी केली आहे की, बांगलादेशी घुसखोरांना रस्ते, पादचारी मार्ग आणि अन्य सरकारी जागांवरून हटवले पाहीजे. यावर त्यांनी जबरदस्ती कब्जा केलेला आहे. तसेच अशीही मागणी केली गेली आहे की, या घुसखोरांनी बनावट कागदपत्र तयार केली आहेत, जसे की आधार कार्ड, मतदान कार्ड इत्यादी ही सर्व कागदपत्रं तत्काळ रद्द केली पाहिजेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com