
German citizen MLA Chennamneni Ramesh News : भारतीय राजकारणात कधी काय घडेल, सांगता येणार नाही. तेलंगणाच्या उच्च न्यायालयाने नुकत्यात दिलेल्या निर्णयामधून याचं उदाहरण समोर आलं आहे. न्यायालयाने एका आमदारास दोषी ठरवलं, कारण या आमदराकडून तो भारतीय असल्याचा दावा केला जात होता, मात्र प्रत्यक्षात तो जर्मनीचा नागरिक असल्याचं दिसून आलं आहे. हे प्रकरण आता चर्चेचा विषय बनला आहे.
तेलंगण उच्च न्यायालयाने अशातच हा निर्णय दिला की, भारत राष्ट्र समिती(BRS) नेते चेन्नामनेनी रमेश जर्मन नागरिक आहेत आणि त्यांनी वेमुलावाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. न्यायालयाच्या मते रमेश यांनी बनावट कागदपत्रांद्वारे स्वत:ला भारतीय नागरिक दर्शवल आण विधानसभा निवडणुकीत भाग घेतला.
हे प्रकरण काँग्रेस नेते आधी श्रीनिवास यांच्याद्वरे दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून समोर आले आहे. ज्यामध्ये त्यांनी आरोप केला की, रमेश यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे निवडणूक लढवली आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं. तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणी गंभीर टिप्पणी करत रमेश यांच्यावर ३० लाख रुपयांचा दंड ठोठवला. यातील 25 लाख रुपये आदी श्रीनिवास यांना दिले जातील. श्रीनिवास यांनी नोव्हेंबर २०२३मध्ये रमेश यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता.
न्यायालयानेहे देखील म्हटले की, रमेश जर्मन दूतावासातून अशी कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरले, की ज्यावरू हे सिद्ध होवू शकेल की ते आता जर्मन नागरिक नाहीत. न्यायालयाचा हा आदेश एक मोठी शिक्षा म्हणून बघितला जात आहे. कारण रमेश यांच्यासारख्या नेत्याने भारतीय राजकारणात वेगळी छाप सोडली होती. परंतु त्यांच्या नागरिकत्वाशी संबंधित वादाने संपूर्ण प्रकरणास वेगळंच वळण दिलं आहे.
चेन्नामनेनी रमेश यांची राजकीय कारकिर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे. ते वेमुलवाडा विधानसभा मतदासंघातून चारवेळा आमदार झाले आहेत. २००९मध्ये त्यांनी तेलगु देसम पार्टीच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. तर २०१० ते २०१८ पर्यंत त्यांनी बीआरएसच्या तिकीटावर तीनवेळा निवडणुकीत विजय मिळवला होता.
(Edited by -Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.